Ketki Chitle: एकीकडं ब्राह्मण तुष्टीकरण अन् दुसरीकड ब्राम्हण असल्याबद्दल अपशब्द; काय म्हणाली केतकी चितळे?

केतकीनं यापूर्वी देखील मागासवर्ग आयोगाच्या सर्वेक्षणावेळी या कामातील कर्मचाऱ्यांविरोधात वादग्रस्त विधान केलं होतं.
Actress Ketki Chitale news
Actress Ketki Chitale news esakal
Updated on

मुंबई : आपल्या वादग्रस्त विधानांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री केतकी चितळे हीनं पुन्हा एकदा वादग्रस्त पोस्ट केली आहे. मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे नुकतीच फडणवीसांवर केलेल्या विधानावरुन तिनं भाष्य केलं आहे. (ketki chitle on manoj jarange says brahmin appeasement and slander being brahmin)

केतकीनं सोशल मीडिया पोस्ट करताना म्हटलं की, "कालचा दिवस फार इंटरेस्टिंग होता. एके ठिकाणी (बरीच वर्षे शिव्या घातल्यावर) ब्राह्मण तुष्टीकरण करताना स्वतःचा कानांनी ऐकलं व डोळ्यांनी बघितलं, आणि दुसरीकडं काही किलोमीटर अंतरावर एका मोर्चाधारक 'महापुरुषांनी' एका राजकारणी नेत्यांना ब्राह्मण म्हणून अपशब्द वापरले, अशी बातमी ऐकली! जय महाराष्ट्र असं म्हणून गप्प बसावं की या सर्कशीत असलेल्या कलाकारांवर हातातील पॉपकॉर्न फेकावं कळत नाहीये" (Marathi Tajya Batmya)

Actress Ketki Chitale news
Haryana INLD Leader Shot Dead: नफे सिंह राठींची गोळ्या घालून हत्या करणारे सीसीटीव्हीत कैद; कोण आहेत मारेकरी?

दरम्यान, मनोज जरांगे यांनी काल आंतरवली सराटीत उपोषणादरम्यान अचानक आक्रमक झाले आणि त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर षडयंत्र करत असल्याची टीका केली. फडणवीसांवर टीका करताना त्यांनी त्याच्या ब्राह्मण असण्यावरही भाष्य केलं. त्यामुळं हे प्रकरण आता मराठा विरुद्ध ब्राह्मण अशा दिशेनं जातंय की काय असं वाटू लागलं होतं. (Latest Marathi News)

Actress Ketki Chitale news
Ajit Pawar Explained: मला राजकारणात कोणी आणलं? अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका

यानंतर जरांगेंनी आपल्यावर विष प्रयोग करुन मारण्याचाही प्रयत्न सुरु असल्याचा आरोप करत मला मारायचचं असेल तर मी स्वतः फडणवीसांच्या सागर बंगल्यावर येतो, असा पवित्रा घेत जरांगे ताडकन उठून मुंबईच्या दिशेनं निघाले होते. पण आज सोमवारी सकाळी त्यांनी युटर्न घेत अंबड तालुक्यातील भांबेरी गावात मुक्काम करुन पुन्हा अंतरवलीकडे गेले आणि आपल्या नेहमीच्या जागी उपोषणाला बसले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.