Khalapur Irshalwadi Landslide: बचावकार्यासाठी जाताना अग्निशमन दलाच्या जवानाचा दम लागल्यामुळे मृत्यू

रायगडमधील इर्शाळवाडीवर दरड कोसळली, चार जणांचा मृत्यू; 100 हून अधिक लोक अडकल्याची शक्यता
Khalapur Irshalwadi Landslide
Khalapur Irshalwadi LandslideEsakal
Updated on

Khalapur Irshalwadi Landslide मुंबई : रायगड जिल्ह्यातील खालापूरच्या इर्शाळवाडी येथे काल रात्री दरड कोसळल्याची माहिती समोर आली आहे. 30 कुटुंब मलब्याखाली अडकल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये अनेक लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. काल (बुधवारी) रात्री ही घटना घडली आहे. एनडीआरएफच्या 2 पथकांनी घटनास्थळी पोहोचून शोध आणि बचावकार्य सुरू केले आहे. (Latest Marathi News)

घटनास्थळी जात असतानाच एका अग्निशमन दलाच्या जवानाचा दम लागून मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. इर्शाळगडावर सहा किलोमीटर अंतरावर ही वाडी आहे. दोन किलोमीटरचा हा ट्रेक आहे. डोंगर चढत जात असताना अग्निशमन दलाच्या एका जवानाला धाप लागली. त्यानंतर वाडीवरील दृश्य पाहून एका अग्निशमन दलाच्या जवानाला हृदयविकाराचा झटका आला. त्यात या जवानाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. इतर जवानांनी या जवानाला तात्काळ रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी या जवानाला मृत घोषित केले.

दरम्यान, घटनास्थळी जात असतानाच एका अग्निशमन दलाच्या जवानाचा दम लागून त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. घटनास्थळी मुसळधार पाऊस आणि धुकं असल्यामुळे बचावकार्यात अडथळा येत आहे. तसेच पावसामुळे डोंगराचा रस्ता अत्यंत निसरडा आणि जमीन भुसभुशीत झाल्यामुळे बचावकार्यात अनेक अडथळा निर्माण होत आहे.(Latest Marathi News)

Khalapur Irshalwadi Landslide
Marathi News Update : इर्शाळवाडीतील दुर्घटना ते मणिपूरमधील हिंसाचार; सर्व अपडेट्स एका क्लिकवर...

आतापर्यंत 22 जणांना रेस्क्यू करण्यात आलं असून 4 जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. तर अद्याप 100 जण बेपत्ताच असल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळी दाखल झाले आहेत. तर मंत्री गिरीश महाजन, अंबादास दानवे, उदय सांमत, दादा भुसे देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत.(Latest Marathi News)

Khalapur Irshalwadi Landslide
Khalapur Irshalwadi Landslide : 22 जणांची सुटका, अनेक कुटुंब मलब्याखाली अडकले, उदय सामंत घटनास्थळी

दुर्घटनेबाबत माहिती मिळताच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. सध्या 22 जणांना रेस्क्यू करण्यात आलं असून 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर 100 जण अद्याप बेपत्ताच असल्याची माहिती मिळत आहे. एनडीआरएफच्या 2 पथकं आणि स्थानिक अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न करत आहेत.(Latest Marathi News)

Khalapur Irshalwadi Landslide
Khalapur Landslide: 'माळीण'ची पुनरावृत्ती? खालापूरमध्ये वसाहतीवर दरड कोसळली; NDRF ची पथके रवाना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.