रायगड जिल्ह्यातील खालापूर मधील इर्शाळवाडीसाठी कालची रात्र काळरात्र ठरली. एका रात्रीत कष्टाने उभं केलेल्या घरावर दरड कोसळली आणि सर्व नष्ट झालं. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
गडावर जाण्यासाठी अनेक पर्यटक या इर्शाळवाडीत थांबत असत. येथे अनेक कुटुंब गुण्यागोविंदाने राहत होते. मात्र आता तिथं फक्त आक्रोश आहे आणि लोक मलब्याखाली दबलेल्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत.
इर्शाळवाडी येथे काही वर्षांपूर्वी फिरायला गेलेल्या पर्यटकांनी फोटो काही घेतले होते. या फोटोंमध्ये अनेक पर्यटक, स्थानिक लोक दिसतात. ही इर्शाळवाडी नष्ट होईल, अशी कल्पना देखील कोणी केली नसेल.
इर्शाळवाडीतील कौलारू घरे लक्ष वेधून घेत असत. वाडीतील लोक निसर्गाच्या सानिध्यात राहत असते. वाडीतील लोक निसर्गावर देखील खूप प्रेम करतात. तिथं प्रत्यक्ष गेल्यावर आपल्याला ही गोष्ट लक्षात येईल.
अनेक पर्यटक इर्शाळवाडीत टेन्टमध्ये विश्रांती घेत असत. निसर्सागाच्या कुशीत वसलेली वाडी अनेकांना खुणवत होती. मात्र याच वाडीवर निसर्गाचा कोप झाला आणि एका रात्रीत परिस्थिती बदलली.
इर्शाळगड किल्ल्याखाली आदिवासी पाड्यावर दरड कोसळली आहे. यामध्ये अनेक लोक अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. बचावकार्य सुरू आहे. मोरबे धरणाच्या वरच्या भागात ही आदिवासी वाडी आहे.
इर्शाळवाडीचे चित्र आज पुर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. अनेक पर्यटक तर या वाडीतील लोकांच्या घरात राहत होते. पर्यटकांच्या जेवणाची व्यवस्था देखील स्थानिक लोक करत असत. सेवाभावी, साधी सोज्वळ मनाची माणसं या वाडीत राहत होते.
मात्र आता इर्शाळवाडी गावात भूस्खलनामुळे मोठे नुकसान झाले आहे. आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळी पोहोचले आहेत. इर्शाळवाडीतील आजचे फोटो मन पिळवटून टाकणारे आहेत.
या घटनेत आतापर्यंत ७ लोकांचा मृत्यू झाला आहे. अजूनही बचावकार्य सुरू आहे.
आतापर्यंत ८० जणांना वाचवण्यात यश आले आहे. मात्र अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
अजूनही 50 हून अधिक लोक ढिगाऱ्याखाली दबले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. एनडीआरएफचे चार पथक मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही घटनास्थळी उपस्थित आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.