Khalapur Irshalwadi Landslide : मित्रांसोबत शाळेत झोपलो होतो अन् मोठ्ठा आवाज झाला...; दुर्घटनेतून बचावलेल्या तरुणांनी सांगितला थरारक अनुभव

इर्शालगडाजवळ डोंगराजवळील एका गावावर काल रात्री दरड कोसळली
Khalapur Irshalwadi Landslide
Khalapur Irshalwadi Landslide Esakal
Updated on

रायगडाच्या परिसरातील इर्शाळवाडीवर काल रात्री उशिरा दरड कोसळली आहे. दरडीखाली 30 ते 40 घर दबली गेल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आतापर्यंत 27 जणांना रेस्क्यू करण्यात आलं असून यामध्ये चौघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. (Latest Marathi News)

या घटनेतून सुदैवाने बचावलेल्या तरुणांनी घटनेचा थरारक अनुभव सांगितला आहे. रात्री झोपण्यासाठी शाळेत गेल्यामुळे हे तरुण सुदैवाने बचावले आहेत, मात्र त्यांचे कुटुंबिय अजूनही बेपत्ता आहेत. या घटनेने अख्खा महाराष्ट्र हादरला आहे. तर इर्शाळवाडीवर येथे नातेवाईकांचा आक्रोश पाहायला मिळतोय. 100 जण बेपत्ता असल्याची माहिती आहे.NDRFचे पथक आणि स्थानिक नागरिक अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

तर या घटनेत सुदैवाने बचावलेल्या तरुणांनी आपला अनुभव सांगितला आहे. इर्शाळवाडीतील 6 तरुण रात्री साडेदहा ते 11 च्या सुमारास शाळेत झोपण्यासाठी गेले होते. दरड कोसळल्याचा आवाज तरुणांना आला आणि ते धावतच डोंगराच्या पायथ्याशी गेले. मात्र त्याठिकाणी मातीचा मोठा ढिगारा पडला होता. त्या ढिगाऱ्याखाली या तरुणांचे आई-वडील आणि कुटुंबीय अडकले आहेत.(Latest Marathi News)

Khalapur Irshalwadi Landslide
Khalapur Irshalwadi Landslide: इर्शाळवाडीवर दुःखाचा डोंगर, मुलीला शोधण्यासाठी बापाची धावाधाव! ४ जणांचा मृत्यू

आपल्या कुटुंबियांच्या काळजीमुळे तरुण कासावीस झालेत. घटना स्थळी तरुणांचा, नातेवाईकांचा आक्रोश पाहायला मिळत आहे. रेस्क्यू ऑपरेशन करणाऱ्या जवानांकडे हे सर्वजण सातत्याने आपल्या कुटुंबियांची चौकशी करत आहेत. दुर्घटनेतून सुखरुप बचावले असले तरीदेखील आपल्या कुटुंबाच्या काळजीने ते कासावीस झाले आहेत. आमचे नातेवाईक कुठे आहेत? ते कसे आहेत? त्यांचा शोध घेण्यासाठी आम्हाला वरती जाऊ द्या, अशी विचारणा तरुण पोलिसांकडे वारंवार करत आहेत.

मध्यरात्री घडलेल्या या दुर्घटनेनंतर रेस्क्यू ऑपरेशन सुरू असून एकूण २७ जणांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आलं आहे. यामध्ये दोन ते तीन लहान मुलांचाही समावेश आहे. अनेक रेस्क्यू टीम या ठिकाणी कार्यरत आहेत.(Latest Marathi News)

Khalapur Irshalwadi Landslide
Khalapur Irshalwadi Landslide : 22 जणांची सुटका, अनेक कुटुंब मलब्याखाली अडकले, उदय सामंत घटनास्थळी

मुलीला शोधण्यासाठी बापाची धावाधाव

नातेवाईकांचा अश्रूचा बांध फुटला आहे. कुणाची मुलगी, कुणाचा भाऊ या मलब्याखाली अडकले आहेत. जिवाचा आकांत करुन लोक त्यांच्या नातेवाईकांना शोधत आहेत. एक बाप त्याच्या मुलीचा शोध घेत आहे. बदलापूर वरून मुलीला शोधायला आल्याचे खचलेल्या बापाने सांगितले. त्याला प्रश्न विचारला असता त्याच्या डोळ्यात फक्त अश्रू होते.(Latest Marathi News)

एनडीआरए जवानाचा मृत्यू

बचावकार्य करताना एका एनडीआरए जवानाचा मृत्यू झाला आहे. एनडीआरएफच्या 2 पथकांनी घटनास्थळी पोहोचून शोध आणि बचावकार्य करत आहेत.या गावात महाराष्ट्राचे मंत्री उदय सामंत आणि दादा भुसे हे रायगड जिल्ह्यातील खालापूरच्या इर्शाळवाडी येथे पोहचले आहेत.

Khalapur Irshalwadi Landslide
Khalapur Irshalwadi Landslide: बचावकार्यासाठी जाताना अग्निशमन दलाच्या जवानाचा दम लागल्यामुळे मृत्यू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.