Onion News : खरीप कांद्याच्या क्षेत्रात 2 लाख हेक्टरने घट; आगारात 51 हजार हेक्टरने कमी क्षेत्र

Onion
Onion esakal
Updated on

Onion News : देशात गेल्या वर्षी तीन लाख ७६ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप कांद्याच्या लागवडीचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले होते. यंदा हे क्षेत्र तीन लाख ४३ हजार हेक्टरचे असून, गेल्या महिन्याअखेर दोन लाख ४७ हजार हेक्टरवर खरीप कांद्याची लागवड झाली आहे.

कांद्याच्या प्रमुख दहा उत्पादक राज्यांमध्ये लागवडीमधील घट उद्दिष्टाच्या तुलनेत एक लाख ९६ हजार हेक्टरची आहे. कांद्याचे आगर असलेल्या नाशिक जिल्ह्यात खरिपात ११ हजार, तर लेट खरिपामध्ये आतापर्यंत ४० हजार हेक्टर अशी एकूण ५१ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावर कांद्याची लागवड झालेली नाही.

तुर्कस्तान, पाकिस्तानचा कांदा संपलेला असताना अफगाणिस्तानमध्ये भूकंपामुळे कांद्याचा पुरवठा विस्कळित झाला आहे. त्यामुळे आखाती देशात कांद्याची मागणी वाढली आहे. निर्यातदारांच्या माहितीनुसार दहा दिवसांत कांद्याच्या नाशिक आगारातून दुबईसाठी ३०० कंटेनर कांदा रवाना झाला आहे. (Kharif onion area decreased by 2 lakh hectares maharashtra news)

गेल्या आठवड्यात ४० टक्के निर्यातशुल्कासह दुबईसाठी टनभर कांद्याचा भाव ५०० डॉलर होता. तो आता ५८० ते ५९० डॉलरपर्यंत पोचला आहे. श्रीलंकेसाठी ५४० डॉलरवरून ५८० ते ५९० डॉलर टन या भावाने कांदा रवाना होत आहे. बांगलादेशसाठी कांद्याच्या टनाचा भाव ५५० डॉलर इतका आहे. पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील नवीन कांदा बाजारात येण्यासाठी पुढचा महिना उजाडणार आहे.

तोपर्यंत भारतीय कांद्याला आखाती देशांमध्ये मागणी राहील, असे निर्यातदारांचे म्हणणे आहे. दरम्यान, खरीप कांद्याचा ३० ते ४० टक्के क्षेत्रावर पावसाने ‘वांदा’ केला आहे. शिवाय कर्नाटकमधील ७५ ते ७९ हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ही सर्व परिस्थिती एकीकडे असताना शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या कांद्याच्या खरेदीला वेग आला आहे. त्यामुळे कांद्याच्या भावात दिवसेंदिवस वाढ होत आहे.

लाल अन् उन्हाळ कांदा अडीच हजारांपर्यंत

मराठवाडा, विदर्भ, कोकणातील काही भागांसह सोलापूर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नगर, सातारा जिल्ह्यांत कांद्याची लागवड होते. गेल्या वर्षी नाशिक जिल्ह्यात निफाड, सिन्नर, येवला, चांदवड, मालेगाव, बागलाण, नांदगाव, कळवण, देवळा या पट्ट्यात खरिपामध्ये २७ हजार ६०९ हेक्टरची, तर लेट खरिपामध्ये ५१ हजार ३२१ हेक्टरची लागवड झाली होती.

यंदा जिल्ह्यात खरिपाची १६ हजार ३०० आणि लेट खरिपामध्ये आतापर्यंत दहा हजार ६८५ हेक्टरची लागवड झाली आहे. सिन्नर, येवला, चांदवड, मालेगाव, बागलाण, नांदगाव, कळवण या पट्ट्यांत पावसाच्या असहाकार्यामुळे लेट खरिपामध्ये कांद्याच्या लागवडीवर मोठा परिणाम झाला आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात बाजारात सर्वसाधारणपणे ६० टक्के नवीन खरीप लाल कांदा आणि ४० टक्के उन्हाळ कांदा असे प्रमाण राहते.

Onion
Maharashtra Onion News : भारतीय कांद्याला बांगलादेश बाजारपेठ दुरावण्याची भीती? पाकिस्तानचा कांदा स्वस्त

मात्र आता नवीन लाल कांद्याची आवक खूपच कमी आहे. सध्या आवक होत असलेल्या लाल कांद्याला पेणमध्ये तन हजार २००, धुळ्यात दोन हजार, धाराशिवमध्ये दोन हजार ५५०, साक्रीमध्ये दोन हजार ३०० रुपये क्विंटल असा सरासरी भाव मिळाला. मनमाडमध्ये नवीन कांद्याचा पहिला भाव अडीच हजारांपर्यंत पोचला होता. आता उन्हाळ कांद्याचा भाव काही बाजारात अडीच हजारांच्या पुढे पोचला आहे.

मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगण, मिझोराम विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत कांद्याच्या भावाचा प्रश्‍न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बाजारात अफवांचे पीक आले आहे. कांद्याच्या भावावर नियंत्रण करण्यासाठी निर्यातबंदीचा निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी चर्चा एकीकडे असताना दुसरीकडे मात्र व्यापारी आणि निर्यातदारांमध्ये निर्यातशुल्क आणखी वाढवण्याचा निर्णय होईल काय? यासंबंधीही चर्चा सुरू आहे.

उन्हाळ कांद्याचे आजचे भाव

(आकडे क्विंटलला सरासरी रुपयांमध्ये)

० येवला- दोन हजार २००

० लासलगाव- दोन हजार ५००

० मनमाड- दोन हजार ३००

० पिंपळगाव बसवंत- दोन हजार ५५०

० नाशिक- दोन हजार ५००

० विंचूर- दोन हजार ५००

० सिन्नर- दोन हजार ३५०

० सटाणा- दोन हजार २८

Onion
Nashik Onion News : उन्हाळ कांद्याच्या लागवड क्षेत्रात घट; सुमारे सव्वा ते दीड लाख क्षेत्रावरच लागवडीचा अंदाज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.