Kharip Review Meeting: "शेतकऱ्यांना दुबार पेरणीची वेळ येणार नाही"; CM शिंदेंनी दिल्या 'या' सूचना

खरीप हंगाम आढावा बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी अनेक निर्णय घेण्यात आले.
CM Eknath Shinde News
CM Eknath Shinde Newsesakal
Updated on

मुंबई : शेतकऱ्यांनी दुबार पेरणीची घाई करु नये, याबाबत त्यांना वेळेवर सर्वकाही माहिती उपलब्ध करुन दिली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. राज्यात खरीप हंगामाला सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीत खरीप हंगाम आढावा बैठकीच आयोजन करण्यात आलं होतं. (Kharip Review Meeting Farmers will not have time to sow twice CM Shinde has given instructions)

CM Eknath Shinde News
Devendra Fadnavis : ....तर थेट एफआयआर दाखल करा; खरीप हंगाम आढावा बैठकीत संतापले!

मुख्यमंत्री म्हणाले, "येणारा खरीप हंगाम अतिशय चांगल्या प्रकारे आणि उत्तम जावा अशी इश्वराकडं प्रार्थना करतो. राज्यस्तरीय खरीप हंगाम बैठक दरवर्षीप्रमाणं यावेळीही पार पडली. कृषी विभाग आणि सहकार विभागाचं यावेळी सादरीकरणं झालं. शेतकऱ्याच्या दृष्टीनं हा महत्वाचा हंगाम आहे. याची अंमलबजावणी योग्य प्रकारे करण्याच्या सूचना सबंधित विभागांना दिल्या आहेत"

CM Eknath Shinde News
Kangana Ranaut: अक्षय पाठोपाठ कंगनाही केदारनाथला बाबांच्या चरणी नतमस्तक

बियाणे-खतं मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. कुठेही तुटवडा भासणार नाही, त्याचबरोबर यामध्ये क्वालिटी राखण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामध्ये बोगस बियाणं वितरीत करणाऱ्यावर कडक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. जर अल-निनो प्रवाहामुळं पाऊस पुढे गेला तर त्यासंदर्भात मार्गर्शन कृषी विभाग आणि कृषी विभाग करतील. दुबार पेरणीची वेळ शेतकऱ्यांवर येऊ नये याच्या सूचना देखील यावेळी करण्यात आल्या आहेत. तसेच याबाबतच्या उपययोजना करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

CM Eknath Shinde News
Success Story: विना शिकवणी गौरवने मारली बाजी! चांगली नोकरी सोडण्याचा धाडसी निर्णय यशस्‍वी

एकंदरीत सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं आहे. आजच्या बैठकीत अशी सविस्तर माहिती दिली गेली तसेच नियोजनही करण्यात आलं आहे. शेतकऱ्यांना या सर्व नियोजनानंतर कुठलीही अडचण येऊ नये अशी आमची भूमिका आहे. तसेच ज्या बँका जबाबदारीनं वाणार नाही, शेतकऱ्यांना बाजूचे निर्णय घेणार नाही त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशाराही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.