Khichadi Scam: "खिचडी घोटाळ्याप्रकरणी ईडीची अटक बेकायदा"; सूरज चव्हाणांचा हायकोर्टात अर्ज

चव्हाण यांच्या ईडी कोठडीत २५ जानेवारीपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
Suraj Chavan
Suraj Chavan
Updated on

मुंबई : खिचडी घोटाळ्या प्रकरणी १८ जानेवारी रोजी ईडीने केलेली अटक बेकायदा असून सत्र न्यायालयाच्या निकालाला सूरज चव्हाण यांनी मुंबई हायकोर्टात आव्हान दिलं आहे. कोणत्याही गुन्ह्यात चव्हाण यांचं नाव आरोपी म्हणून नाही त्यामुळं चव्हाण यांना अटक करता येणार नाही तसेच सत्र न्यायालयानं दिलेले कोठडीचे आदेश रद्द करावेत अशी मागणी चव्हाण यांनी याचिकेद्वारे केली आहे. या याचिकेवर हायकोर्टात २९ जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. (khichadi scam ed arrest Illegal suraj chavan application in mumbai high court)

Suraj Chavan
Women's Policy: महिलांच्या अनेक समस्यांवर प्रभावी ठरणारं नवं महिला धोरण; कर-गृह सवलत, मातृत्व रजेसह अनेक महत्वाच्या तरतुदी

कोठडीत २५ जानेवारीपर्यंत वाढ

युवा सेना कोअर कमिटीचे सदस्य तसेच आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सूरज चव्हाण यांना ईडीने खिचडी घोटाळ्याप्रकरणी अटक केली आहे. सूरज चव्हाण यांची ईडी कोठडीची मुदत संपल्याने त्यांना आज विशेष पीएमएलए कोर्टात सादर करण्यात आले. यावेळी विशेष पीएमएलए कोर्टानं आज सूरज चव्हाणच्या ईडी कोठडीत २५ जानेवारीपर्यंत वाढ केली आहे. (Latest Marathi News)

Suraj Chavan
Balasaheb Thackeray: रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा अन् बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन; PM मोदींनी दिल्या सदिच्छा

चव्हाण यांनी घोटाळ्यातील रक्कमेचं घर घेतलं

ईडीच्यावतीनं बाजू मांडणाऱ्या वकिलांनी कोर्टाला सांगितले की, "चव्हाण यांना मिळालेली अधिकची रक्कम त्यांनी मालमत्ता खरेदीसाठी तसेच दुग्ध व्यवसायात गुंतवली आहे. याप्रकरणी अधिक तपास करायचा असून ईडी कोठडी आणखी सात दिवसांसाठी वाढवण्यात यावी, अशी मागणी ईडीच्या वकिलांनी केली. न्यायालयानं हा युक्तिवाद ऐकून घेत सात दिवसाच्या ऐवजी ईडी कोठडी तीन दिवसांसाठी वाढवली व सुनावणी तहकूब केली. (Marathi Tajya Batmya)

Suraj Chavan
Ramlalla Pran Pratishta: मोदींच्या आवाहनाला देशवासियांचा उत्स्फुर्त प्रतिसाद; देशभरात साजरी झाली दिवाळी

याचिकेत दुरुस्तीसाठी मुभा

सत्र न्यायालयाने ईडी कोठडीची शिक्षा सुनावल्यानंतर सूरज चव्हाण यांनी याविरोधात मुंबई हायकोर्टात धाव घेत याचिका दाखल केली. या याचिकेवर आज न्या. प्रकाश नाईक यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली. तेव्हा सत्र न्यायालयानं आज दिलेल्या निकालाची प्रत याचिकेत जोडण्यासाठी हायकोर्टानं चव्हाण यांच्या वकिलांना परवानगी दिली व सुनावणी २९ जानेवारीपर्यंत तहकूब केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.