खोपोली: पाच अपहरणकर्त्यांना अटक; अपहरण झालेल्याची यशस्वी सुटका

Kidnaping
Kidnapingsakal media
Updated on

खोपोली: खोपोली पोलीस ठाणे (Khopoli police station) अंतर्गत शीळफाटा येथे रात्री गस्तीवर असणाऱ्या पोलिसांनी एका चारचाकी वाहनाचा संशय आल्याने त्या वाहनातील इसमांची चौकशी केल्यावर एकूण सहा इसमांपैकी पाच जणांनी एकाचे अपहरण (kidnapped) करून खंडणी (extortion) मागितल्याचे उघड झाले. तातडीने पोलिसांनी त्या पाच जणांच्या मुसक्या आवळून अटक करून (culprit arrested) अपहरण झालेल्याची सुखरूप सुटका करण्यात आली.

Kidnaping
BMC : तीन सदस्यीय प्रभाग रचनेला उच्च न्यायालयात आव्हान

गुरुवारी दि 30 च्या रात्री खोपोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर व पोलीस अंमलदार स्वागत तांबे , राम मासाळ हे शिळफाटा येथे गस्त घालत असताना MH-04-CT-2597 या क्रमांकाची अल्टो कार आली. तिच्या मागील नंबर प्लेटवर चिक्खल लावला असल्याने पोलिसांना संशय आला व त्यांनी आतील इसमांची चौकशी केली. त्या गाडीत सहा इसम होते. सुरुवातीला ते उडवा उडवीची उत्तरे देत होते.

Kidnaping
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भटके विमुक्तांची मते निर्णायक - नरेंद्र पवार

पण त्यातील एकाने पोलीस अधिकाऱ्यांना 'मला वाचवा ' अशी विनंती केली असता पोलीस सतर्क झाले आणि त्या सर्वांना खोपोली पोलीस ठाण्यात आणून सखोल चौकशी सुरू झाली.चौकशी नंतर यातील पाच जण, नावे : वामन मारुती शिंदे (39), योगेंद्र प्रसाद (25), दिलीप पासवान (32), धुरपचंद्र यादव (33), संदीप सोनावणे (35) सर्व राहणार अंबरनाथ, यांनी पुणे जिल्ह्यातील मुळशी येथिल दिगंबर इंदलसिंग चितोडिया यांचे अपहरण करून दोन दिवस अंबरनाथ येथे डांबून ठेवले होते व त्यांच्या घरचांकडे 25 लाख रुपयाची मागणी केली असल्याचे स्पष्ट झाले.

खोपोली पोलिसांनी अधिक तपास केल्यानंतर या बाबत पुण्यातील हिंजवडी पोलीस ठाणे येथे गु.र. क्र.738/2021, भादवीसंक.364(अ),386 या प्रमाणे अपहरण व खंडणी मागणे या गुन्ह्याप्रमाणे नोंद केल्याची माहिती मिळाली. सदर पोलिसांनी खोपोली पोलीस ठाण्यात येऊन सदर आरोपिंचा ताबा घेऊन अपहरण झालेल्या व्यक्तीस त्यांच्या कुटुंबाकडे सुखरूप ताब्यात दिले. या यशस्वी कामगिरी बद्दल सहाय्यक पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर, पोलीस अंमलदार राम मासाळ,स्वागत तांबे यांचे रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी खास अभिनंदन केले असून या तिघांना योग्य ते पारितोषिक ही देण्यात येणार आहे. या बाबतची संपूर्ण माहिती शुक्रवारी खोपोलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांनी दिली .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.