जरंडेश्वर कारखाना घोटाळ्यात अजित पवारांचा हात

Ajit Pawar
Ajit Pawaresakal
Updated on
Summary

जरंडेश्वर कारखान्याच्या 20 जणांच्या शिष्टमंडळाने आज किरीट सोमय्यांची शासकीय विश्रामगृहात भेट घेतली.

सातारा : भाजप नेते किरीट सोमय्या (BJP Leader Kirit Somaiya) यांच्या कोल्हापूर दौऱ्याला आजपासून सुरवात झालीय. भाजपतर्फे त्यांचे नुकतेच कऱ्हाड, मलकापूर, उंब्रजात जोरदार स्वागत करण्यात आले. सोमवारी रात्री उशिरा ते साताऱ्यातील शासकीय विश्रामगृहात दाखल झाले. दरम्यान, आज (मंगळवार) सकाळी लवकर जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या (Jarandeshwar Sugar Factory) संचालकांनी त्यांची भेट घेऊन लिलाव प्रक्रियेत झालेल्या भ्रष्टाचाराबाबत त्यांना माहिती दिली. त्यानंतर सोमय्यांनी पत्रकारांशी बोलताना जरंडेश्वर कारखान्याबाबत झालेल्या गोष्टींची शहानिशा करण्यासाठी मी कारखान्याला भेट देणार असून अजित पवारांचे (Ajit Pawar) धागेदोरे बाहेर काढणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

जरंडेश्वर साखर कारखान्याच्या लिलावात झालेल्या घोटाळाप्रकरणी कारखान्याच्या 20 जणांच्या शिष्टमंडळाने आज किरीट सोमय्यांची शासकीय विश्रामगृहात भेट घेतली व जरंडेश्वर लिलावप्रकरणी झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी निवेदनाद्वारे सोमय्यांकडे केली. सोमय्या यांनी येत्या पाच ऑक्‍टोबरला जरंडेश्वर कारखान्याला भेट देणार असल्याचे जाहीर केलेय. दरम्यान, जरंडेश्वर साखर कारखान्याबाबत घडणाऱ्या सर्व गोष्टींच्या पाठीमागे अजित पवारच आहेत, असा गंभीर आरोप जरंडेश्वरचे उपाध्यक्ष शंकरराव भोसले यांनी केलाय.

Ajit Pawar
घोटाळेबाज राक्षसाचा नाश करण्यासाठी कोल्हापूरला निघालोय

अजित पवार-जरंडेश्वर कारखान्याचं काय कनेक्शन?

जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना हा प्रथम मेसर्स गुरू कमोडिटी प्रा. लि., कंपनीने विकत घेतला होता. मात्र, ही गुरू कमोडिटी कंपनी बनावट असल्याचा ईडीच्या अधिकाऱ्यांना संशय आलाय. जरंडेश्वर शुगर मिलने पुणे जिल्हा बँकेकडून सुमारे 700 कोटीचं कर्ज घेतलंय. गुरु कमोडिटीजनं 2010 मध्ये 65 कोटी 75 लाख रुपयांना खरेदी केला होता. हा जरंडेश्वर कारखाना सध्या मेसर्स गुरू कमोडिटी सर्व्हिसेस यांच्या मालकीचा आहे. ह्या कारखान्याला मेसर्स जरंडेश्वर शुगर मिल प्रा. लिमिटेडला भाड्याने देण्यात आलंय. ईडीने केलेल्या तपासात मेसर्स स्पार्कलिंग कंपनी ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित आहे. अजित पवारांच्या म्हणण्यानुसार, हायकोर्टाच्या आदेशानं या कारखान्याचा लिलाव करण्यात आलाय, असं नमूद केलं गेलंय.

Ajit Pawar
कोण आला रे कोण आला, भाजपचा 'वाघ' आला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()