Kirit somaiya vs Hasan mushrif Live Update : कराड (सातारा) : ठाकरे सरकारविरूध्द मी केलेल्या तक्रारीवर चौकशी सुरू झाली असून ईडीने अतिरिक्त माहिती माझ्याकडे मागवली असल्याची माहिती किरीट सोमय्यांनी (BJP leader kirit somaiya) पत्रकार परिषदेत दिली. त्या भीतीने माझ्यावर हल्ला करणार आहे का? ही शरद पवार यांची रणनीती आहे का ?, असा सवाल सोमय्यांनी उपस्थित केला.भाजप नेते किरीट सोमय्यांनी आताच पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. तसेच ३० तारखेला अजित पवार (Ajit Pawar) यांनी घोटाळा केलेल्या जरंडेश्वर कारखान्याची चौकशी पाहणी करणार असल्याचे सांगत सोमय्यांनी पवारांवरही आरोप केले आहेत.
जरंडेश्वर कारखान्यावरुन अजित पवारांना 'चॅलेंज'
अजित पवारांमध्ये हिम्मत असेल, तर जरंडेश्वर कारखान्याच्या व्हॅल्यूएशनचे कागद का लोकांसमोर ठेवत नाहीत, असा सवाल किरीट सोमय्यांनी केलाय. 65 कोटीत कारखाना घेतला अन् 700 कोटीचं बँकेचं कर्ज घेतलंय. जरंडेश्वरच्या एका व्हॅल्यूअरचं नाव वैभव शिंदे आहे, असंही त्यांनी पवारांवर निशाणा साधताना नमूद केलंय.
भाजपा नेते किरीट सोमय्या (BJP leader kirit somaiya) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर निशाणा साधल्यानंतर त्यांनी हसन मुश्रीफांना (Hasan Mushrif) 'टार्गेट' करण्यास सुरुवात केलीय. सोमय्यांनी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. या आरोपामुळे राज्यातील वातावरण चांगलंच ढवळून निघालंय. आज (ता. 20) पहाटे साडेचारच्या सुमारास किरीट सोमय्या यांना पोलिसांनी कऱ्हाडात ताब्यात घेतले. त्यामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापण्याची चिन्हे आहेत
मला रोखण्यासाठी महाविकास आघाडी सरकारचे प्रयत्न
यावेळी बोलतांना किरीट सोमय्या यांनी मला रोखण्यासाठी उद्धव ठाकरे आणि शरद पवार कारस्थान करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. सोमय्या म्हणाले, “हसन मुश्रिफ यांचा एक घोटाळा बाहेर काढला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात जावं लागलं. आता दुसरा घोटाळा उघडकीस आल्यानंतर त्यांना तुरुंगात जावं लागेल. त्यामुळे मला रोखण्यासाठी महाविकास आघाडी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत.
मला सहा तास कोंडून ठेवलं.
हसन मुश्रीफ यांच्यामुळे मला अंबे मातेचं दर्शन घेता आलं नसल्याचं किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे. तक्रार करणाऱ्यालाच अटक केली असल्याचा आरोप सोमय्यांनी यावेळी परिषदेत केला आहे. तक्रारदाराला रोखण्याचा इतिहास मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच करू शकतात, असंही ते म्हणालेत. मला सहा तास कोंडून ठेवलं. वकिलांनी नोटीस दिल्यानंतर मग मला विसर्जन करायला जाऊ दिलं. मला सीएसटी स्टेशनला अडवून ठेवलं.मला गाडी मिळणार नाही अशी व्यवस्था केली. पोलिसांनी खोटी बनवलेली ऑर्डर वाचून दाखवली अजी चॅलेंज केली तर पळून गेले, असं त्यांनी सांगितलं.
सोमय्यांना सकाळी घेतलं होतं ताब्यात
किरीट सोमय्या BJP leader kirit somaiya) यांना पहाटे 4.30 च्या सुमारास पोलिसांनी कराडमध्ये ताब्यात घेतलं होतं. कोल्हापूर आणि सातारा पोलिसांनी (Kolhapur and Satara Police)ही संयुक्तरित्या कारवाई केली होती. ताब्यात घेतल्यानंतर ठाकरे सरकार इतकं घाबरलं आहे की मला कोल्हापूरला जाण्यास बंदी घातली अशी प्रतिक्रिया सोमय्यांनी दिली. तसंच कोल्हापुराला जाऊन मला आंबेमातेचे दर्शन करायचं आहे. आज मी कराडमध्ये उतरत आहे. पण पुढच्या दोन दिवसांत मी कोल्हापुराला जाणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.