किरीट आणि नील सोमय्यांना आज पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश

Kirit Somaiya Neil Somaiya
Kirit Somaiya Neil Somaiyaesakal
Updated on
Summary

'INS विक्रांत' वाचवण्यासाठी किरीट सोमय्या यांनी निधी गोळा केला होता.

भारतीय नौदलाची (Indian Navy) विमानवाहू युद्धनौका 'INS विक्रांत' वाचवण्यासाठी किरीट सोमय्या यांनी निधी गोळा केला होता. मात्र, हा निधी सोमय्यांनी त्यांच्या व्यवसायासाठी वापरल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलाय. याप्रकरणी किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या (Neil Somaiya) यांच्यावर मुंबईत (Mumbai) गुन्हा दाखल झाला असून मुंबईतील ट्रॉम्बे पोलिसांनी (Trombay Police Station) आज 11 वाजता त्यांना हजर राहण्याचे आदेश दिल्याचं समजतंय.

भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्यावर ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय. माजी सैनिक बबन भोसले (Former soldier Baban Bhosle) यांनी परवा रात्री उशिरा ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात ही तक्रार दिलीय.

Kirit Somaiya Neil Somaiya
शरद पवारांच्या घरावरील हल्ल्यानंतर गृहराज्यमंत्री आक्रमक

कलम 420, 406, 34 अंतर्गत पोलिसांनी हा गुन्हा दाखल केलाय. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचे भाऊ आमदार सुनील राऊत यांनी भोसले आणि इतर शिवसेना पदाधिकारी यांच्यासह काल संध्याकाळी अप्पर पोलीस आयुक्त संजय दराडे यांची भेट घेतली होती. त्यानंतर भोसले यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी हा गुन्हा दाखल केलाय.

INS विक्रांत ही युद्धनौका वाचवण्यासाठी नागरिकांकडून गोळा केलेल्या निधीत कोट्यवधींचा अपहार केल्याचा आरोप सोमय्या पिता-पुत्रांवर करण्यात आलाय. माजी सैनिक बबन भोसले यांच्या तक्रारीवरुन ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला असून ट्रॉम्बे पोलिसांनी आज 11 वाजता हजर राहण्याचे आदेश दिलेत.

Kirit Somaiya Neil Somaiya
शरद पवारांच्या घरावरील हल्ल्यानंतर अ‍ॅड. गुणरत्न सदावर्तेंची पहिली प्रतिक्रिया

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()