पाटणकरांनंतर आणखी सहा घोटाळे बाहेर काढणार; सोमय्यांचा इशारा

'संबंधित व्यक्ती आणि मुंबई महापालिका यांच्यावर तातडीने कारवाई करावी'
Kirit Somaiya
Kirit Somaiya sakal media
Updated on
Summary

'याप्रकरणी संबंधित व्यक्ती आणि मुंबई महापालिका यांच्यावर तातडीने कारवाई करावी'

श्रीधर पाटनकर (Shridhar Patankar) यांच्यानंतर आता आणखी एक घोटाळा समोर आला आहे. मुंबई महानगरपालिकेने (BMC) कोणत्याही प्रकारच्या टेंडरची पारदर्शक प्रक्रिया न करता एका फर्जी, बोगस कंपनीला मुंबईतल्या अनेक कोविड सेंटरचे कॉन्ट्राक्ट दिले असा आरोप करण्यात आला आहे. सुजित पाटकर यांच्या लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस या कंपनीने आपली पार्टनरशिप रजिस्ट्रेशन २६ जून २०२० ला झाले असल्याचे भासवले आहे. (Covid-19) पण जे पार्टनरशिप डिड आणि बाकी कागदपत्र बोगस असल्याचे स्पष्ट करत भाजपा किरीट सोमय्या पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत.

Kirit Somaiya
आशिष शेलारांची मागणी मान्य; गृहमंत्र्यांची सभागृहात मोठी घोषणा

याप्रकरणी भाजपाचे किरीट सोमय्या (Kirit somaiya) यांनी महानगर दंडाधिकारीकडे यांच्यांकडे तक्रार दाखल केली आहे. कोविड सेंटर घोटाळ्याच्या विरोधात किरीट सोमय्या यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. पाटनकरांनंतर आणखी ६ घोटाळे उघड करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. संबंधित व्यक्ती आणि मुंबई महापालिका यांच्यावर तातडीने कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.

एक अशी कंपनी जी रजिस्टर झालेली नाही. ज्यांच्याकडे मनुष्यबळ, कार्यालय, अनुभव नाही अशा बोगस कंपन्यांना कोविड सेंटर चालवण्याचं, आयसीयु युनिटचे कॉन्ट्राक्ट देणं म्हणजे हजारो कोविड रुग्णाच्या जिवाशी खेळण्याचे काम या रुग्णालयानं आणि मुंबई महानगरपालिकेने केलं आहे. या कंपनीला पुणे महानगरपालिका आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणने ब्लॅकलिस्ट केल्याची गोष्ट त्यांनी लपवली. ब्लॅकलिस्ट झाल्यानंतरही या रुग्णालयाला ४ कोविड सेंटरचे काम देणं म्हणजे मानवी जिवाशी खेळणं आहे. मेडिकल इमर्जन्सीच्या नावाखाली भ्रष्टाचार आणि जिवाशी खेळ केल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला आहे.

Kirit Somaiya
'ठाकरेंच्या प्रकरणात हवाला ऑपरेटरची एंट्री; मुख्यमंत्र्यांची झोप उडणार'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()