'ही कुठल्या मंत्र्याची बेनामी संपत्ती ? ठाकरे सरकार जवाब दो' - सोमय्या

दरम्यान त्यांनी आता पुन्हा एकदा खळबळजनक ट्वीट केले आहे. यामध्ये त्यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर ताशेर ओढले आहेत.
Kirit Somaiya
Kirit Somaiyasakal media
Updated on
Summary

दरम्यान त्यांनी आता पुन्हा एकदा खळबळजनक ट्वीट केले आहे. यामध्ये त्यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर ताशेर ओढले आहेत.

भाजपाचे नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) गेले काही दिवस सत्ताधारी पक्षातील नेत्यांच्या बेनामी संपत्ती संदर्भात आरोप करत आहेत. त्यांनी त्या संबधित ठोस पुरावे सादर करत नेतेमंडळींना धारेवर धरलं आहे. यामध्ये सोमय्या यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, (Ajit pawar) ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ (Hasan mushrif) यांच्यावरही बेनामी संपत्ती संदर्भात गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान त्यांनी आता पुन्हा एकदा खळबळजनक ट्वीट केले आहे. यामध्ये त्यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर ताशेर ओढले आहेत. (Political News)

Kirit Somaiya
Aryan Khan Case - नवाब मलिकांनी सांगितलं सॅम डिसूझाचं खरं नाव

या ट्वीटमध्ये त्यांनी एक खळबळजनक माहिती सांगितली आहे. ते म्हणतात, विदर्भाच्या पश्चिम सिमेवर असणाऱ्या बुलढाणा येथील सहकारी पतसंस्थेचे १२०० बेनामी अकाउंट हे ५४ कोटी रुपयांचे आहेत. हे आता इन्कम टॅक्स विभागाच्या हाती सापडले असून ही कुठल्या मंत्र्याची बेनामी संपत्ती आहे ? याचे उत्तर लवकरात लवकर ठाकरे सरकारने द्यावे. त्यांच्या या ट्वीटमुळे आता आता कोणत्या मंत्र्यांकडे सोमय्यांचा रोख असणार आहे याकडे लक्ष लागून राहिले आहे.

Kirit Somaiya
इराक पंतप्रधानांच्या निवासस्थानी ड्रोन हल्ला

दरम्यान मागील काही दिवसांपासून किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांच्या बेनामी संपत्ती संदर्भात काही गंभीर वक्तव्ये केली आहेत. या नेत्यांनी जनतेला याता हिशोब द्यावा असंही त्यांनी म्हटल आहे. आपण दिवाळीनंतर आपण बॉम्ब फोडणार आहोत असं सूचक वक्तव्य सोमय्या यांनी केलं होतं. आता त्याची सुरवात झाली आहे की काय? राजकीय वर्तुळात असा सुर उमटत असून या सोमय्या यांच्या पुढीस भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.