'मुंबई महापालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना वाचवण्याचा आयुक्तांचा प्रयत्न'

बीएमसीच्या आयुक्तांना चौकशीसाठी बोलवल्याने महापालिका वर्तुळात खळबळ
kirit somaiya , Iqbal Singh Chahal
kirit somaiya , Iqbal Singh ChahalEsakal
Updated on

मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांना आयकर विभागाने (Income tax) नोटीस बजावली आहे. माजी स्थायी सभापती यशवंत जाधव यांच्यांशी संबंधित मालमत्तांवर आयकर विभागाने छापा टाकला होता.या प्रकरणी चहल यांना आयकर विभागाने बोलवल होत.पण ते या चौकशीला हजर राहिले नव्हते. त्यामुळे आयकर विभागाने नोटीस बजावली. बीएमसीच्या आयुक्तांना चौकशीसाठी बोलवल्याने महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. यावर आता भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी टीका केली आहे.

kirit somaiya , Iqbal Singh Chahal
प्रकाश आंबेडकरांनी निवडणुकीत एक हजार कोटी घेतले; संतोष बांगर

किरीट सोमय्या निशाणा साधताना म्हणाले, महापालिका आयुक्त काॅन्ट्रक्टची माहिती का देत नाहीत. महापालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत का असा सवाल सोमय्यांनी केला आहे.

महापालिका आयुक्तांना माहिती द्यावीच लागणार आहे. इनकम टॅक्स, ईडी आणि त्यानंतर मंत्रालय मागं लागणार आहे. ज्यापध्दतीने त्यांनी मुंबई महापालिकेची लुट केलीय तशीच त्यांना भरपाई द्यावी लागेल असेही सोमय्या म्हणाले.

kirit somaiya , Iqbal Singh Chahal
ज्या आमदारांना घर हवं ते घेतील बाकी नाकारतील : संतोष बांगर

कोरोना काळात अॅफिडेव्हीट अॅक्टनुसार विनानिविदा काम करता येते. त्यामुळे कोणत्याही नियमांचा भंग केला नाही असे स्पष्टीकरण चहल यांनी दिले आहे. आयटी कायदा १९६१ च्या अंतर्गत आयटीनं स्थायी समिती सदस्य यशवंत जाधव यांच्या चौकशीसंदर्भात आयुक्त चहल यांना नोटीस पाठवली. इकबाल चहल यांना पाठवलेल्या नोटीसमध्ये २५ फेब्रुवारीला मुंबई महापालिकेतील पदाअधिकारी आणि कंत्राटदारांवर टाकलेल्या छाप्यांसदर्भात कागदपत्रं मागवली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.