मुश्रीफांचे घोटाळे बाहेर काढा अशी फडणवीस, पाटलांची सूचना : सोमय्या

Kirit Somaiya
Kirit Somaiyaesakal
Updated on
Summary

2020 मध्ये कोणताही साखर कारखाना चालवण्याचा अनुभव नसलेल्या कंपनीकडे जबाबदारी दिली गेली.

कऱ्हाड (सातारा) : मला घरच्या कार्यालयात कोंडून ठेवण्यात आलं. 200 पोलिस बाहेर होते. त्यांना हात जोडून प्रार्थना केली, त्यांना ऑर्डर दाखवण्याची विनंती केली. त्यानंतर पोलिसांनी मला परवानगी दिली. मात्र, ही ठाकरे सरकारची ठोकशाही असून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या बाहेर मला धक्काबुक्की करण्यात आली असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या (BJP leader kirit somaiya) यांनी केला आहे. मुश्रीफांचे (Hasan Mushrif) घोटाळे जनतेसमोर मांडण्याची सूचना मला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिली असून या घोटाळ्याबाबत उद्या ईडीकडे कागदपत्रे देणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

ते पुढे म्हणाले, आप्पासाहेब नलावडे सहकारी साखर कारखान्यात मुश्रीफानी १०० कोटींचा घोटाळा केली असून याची देखील चौकशी होणे अपेक्षित आहे. पुढच्या आठवड्यात हसन मुश्रीफांचा आणखी एक घोटाळा मी समोर आणणार आहे. मी अर्थमंत्रालय, इन्कम टॅक्स चेअरमन, ईडीचे संचालक, सहकार मंत्रालयामध्ये २७०० पेजेसचे पुरावे दिलेत. त्यावर चौकशी सुरु झालीय. मी अधिक माहिती मागवलीय, ती माहिती दोन दिवसांत मला मिळून जाईल. ईडी आणि संचालक मंडळाकडून याची चौकशी सुरु. त्या भीतीनेच राष्ट्रवादीचे गुंड माझ्यावर हल्ला करत आहेत. हसन मुश्रीफांच्या स्वागतासाठी जनसमुदायाला परवानगी. मग, मला कोल्हापुरात येण्यास परवानगी का नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. या प्रकरणावरून लक्ष वळवण्यासाठी शरद पवारांनी एक व्यूह रचना आखली आहे. मात्र, ती काही कामी येणार नसल्याचाही घणाघात त्यांनी केला.

Kirit Somaiya
दोन दिवसात काॅंग्रेसच्या 2 नेत्यांचे घोटाळे बाहेर काढणार; चंद्रकांतदादांचा इशारा

कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मला शहरात प्रतिबंध केला आहे, असा आदेश उद्धव ठाकरेंच्या पोलिसांनी मला दिला. पोलिसांनी मला वाचून दाखवलं. कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिला आहे, की किरीट सोमय्यांना मुंबई बाहेर जाऊ देऊ नये. मात्र, कोल्हापूर पोलिसांच्या ऑर्डरीमध्ये किरीट सोमय्यांना मुंबईतून बाहेर पडू देऊ नका, कोंडून ठेवा असं कुठेच नाही. त्यामुळे ठाकरे सरकार पोलिसांच्या व्यक्तिगत स्वातंत्र्यावर गदा आणतात. आपल्या हिंदू धर्मात गणेश विसर्जनाला जाऊन द्यायचं नाही, हा कोणता कायदा आहे. मला डांबून ठेवणाऱ्या पोलिसांवर कारवाई व्हायला हवी, असेही त्यांनी सांगितले.

Kirit Somaiya
ठाकरे सरकारनं घरात कोंडून ठेवलं, मला धक्काबुक्की केली

2020 मध्ये कोणताही साखर कारखाना चालवण्याचा अनुभव नसलेल्या कंपनीकडे जबाबदारी दिली गेली. ती का दिली, ते शरद पवारांना माहितीय. मतीन हसन मंगोली हे हसन मुश्रीफांचे जावई या कंपनीचे मालक आहेत. तर, अप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज साखर कारखान्यात यांचे ९८ टक्के बोगस गुंतवणूक.असून पुढच्या आठवड्यात हसन मुश्रीफांचा तिसरा घोटाळाही मी उघड करणार असल्याचंही सोमय्या यांनी म्हटलं आहे.

Kirit Somaiya
हीच शरद पवार यांची रणनीती का? सोमय्यांचा सवाल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()