अनिल परबांनी मे 2017 मध्ये साठे यांच्याकडून दापोलीतील मुरुड समुद्र किनाऱ्यावरील जमीन घेतलीय.
Kirit Somaiya : महापालिका निवडणुकांच्या तोंडावर शिवसेना (Shiv Sena) नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्यावर काही दिवसांपूर्वी ईडीनं (ED) धाड टाकली. एवढंच नाहीतर त्यांच्या निकटवर्तींयांवरही ईडीकडून धाडी टाकण्यात आल्या आहेत. दापोली रिसॉर्ट संदर्भातील कथित जमीन व्यवहार घोटाळ्याप्रकरणी ईडीनं अनिल परबांवर कारवाई केल्याचं बोललं जातंय.
भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी अनिल परबांवर तोफ डागत हा कथित घोटाळा उघडकीस आणल्याचा दावा केला होता. अनिल परब यांनी लॉकडाऊन काळात शेतजमिनीवर रिसॉर्टचं बांधकाम करून फसवणूक केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केलाय. आज सोमय्यांनी पुन्हा ट्विटव्दारे थेट राज्याच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहून विभास साठे (Vibhas Sathe) यांच्या सुरक्षाविषयी काळजी व्यक्त केलीय.
पोलीस महासंचालक रजनीश सेठ (Director General of Police Rajnish Seth) यांना लिहिलेल्या पत्रात किरीट सोमय्यांनी म्हटलंय, महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या दापोली रिसॉर्ट घोटाळ्याची (Dapoli resorts Scam) चौकशी सुरुय. या घोटाळ्यासंबंधी अनेक तपास यंत्रणा/संस्थांनी, तसेच पर्यावरण मंत्रालय महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकार यांनी अनिल परब आणि त्यांच्या साई रिसॉर्ट एनएक्सवर (Sai Resort) कारवाई करण्याचा ही निर्णय घेतलाय.
अनिल परब यांनी मे 2017 मध्ये विभास साठे यांच्याकडून दापोलीतील मुरुड समुद्र किनाऱ्यावरील जमीन घेतली. तसेच फ्रॉड, फोर्जरी, चीटिंग करून तिथं रिसॉर्ट बांधला. परब या घोटाळ्यामुळं अडचणीत आले आहेत. म्हणून आम्हाला भीती वाटते की, अनिल परब हे विभास साठेंवर दडपण आणणार आहेत. त्यामुळं साठे यांचे 'मनसुख हिरेन' होऊ नये हे पाहण्याची जबाबदारी महाराष्ट्र पोलिसांची आहे. विभास साठे यांच्या जिवाला धोका लक्षात ठेऊन त्यांच्या सुरक्षेची व्यवस्था महाराष्ट्र पोलिसांनी करावी, अशी विनंती सोमय्यांनी पत्रव्दारे पोलीस महासंचालक सेठ यांच्याकडं केलीय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.