मुंबई : ठाकरे सरकारचे (uddhav thackeray) ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (hasan mushrif) यांनी आपल्या जावयाच्या कंपनीला कंत्राट दिले होते. दर वर्षी या कंपनीला यातून १५०० कोटींची आवक होणार होती. ते कंत्राट अखेर रद्द करण्यात आल्याची माहिती भाजपा नेते किरीट सोमय्या (bjp Kirit Somaiyya) यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली. काय म्हणाले सोमय्या..
पुन्हा एकदा सिद्ध केले - सोमय्या
"ठाकरे सरकारनी मंत्री हसन मुश्रीफचे जावई मतीन मंगोली, जयोस्तुते मेनेजमेंट कंपनी ला दिलेला १५०० कोटींचा कॉन्ट्रॅक्ट आत्ता रद्द केला आहे. आम्ही पुन्हा एकदा सिद्ध केले. ठाकरे सरकार घोटलों की सरकार" अशी पोस्ट करत सोमय्या यांनी ट्विट केले आहे.
१५०० कोटींची आवक होणार होती
भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी यासंबंधी तक्रार दाखल केली होती. तसेच त्यांनी माध्यमांसमोर हा विषय आणला होता. मुश्रीफ यांनी अपारदर्शकपणे १० मार्च २०२१ रोजी हे १० वर्षांचे कंत्राट दिल्याचे पुरावे सोमय्यांनी दिले होते. सप्टेंबर महिन्यात त्यांनी माहिती उघडकीस आणाली होती. ठाकरे सरकारचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपल्या जावयाच्या जयोस्तूते मॅनेजमेंट प्रा. लि. कंपनीला १५०० कोटी रुपयांचे कंत्राट दिले होते. याची वैधता १० वर्षे होती. महाराष्ट्रातील २७००० ग्राम पंचायतीचे TDS रिटर्न पुढच्या १० वर्षांपर्यंत जयोस्तूते मॅनेजमेंट प्रा. लि. कंपनी फाइल करणार आणि त्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला दरवर्षी जवळपास ५०,००० रुपये द्यावे लागणार होते. दर वर्षी जयोस्तूते मॅनेजमेंट कंपनीला यातून १५०० कोटींची आवक होणार होती.
कंत्राट दिल्याने घोटाळा झाल्याचा आरोप
जयोस्तूते मॅनेजमेंट प्रा. लि. कंपनीची स्थापना २०१२-१३ मध्ये झाली. परंतु हसन मुश्रीफ यांचे जावई मतीन यांनी ही कंपनी ८ महिन्यांपूर्वीच विकत घेतली. मागील ८ वर्षात या कंपनीला काहीच आवक नाही. तसेच सन २०१९-२० मध्येही कंपनीची उलाढाल शून्य होती. यानंतरही संबंधित कंपनीला कंत्राट दिल्याने सोमय्या यांनी घोटाळा झाल्याचा आरोप केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.