Kishor Aware Murder Case: किशोर आवारे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीला पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून अटक

पुण्यातील जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारेंच्या हत्या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक
kishor Aware
kishor AwareEsakal
Updated on

पुण्यातील जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची मे महिन्यामध्ये हत्या झाली होती. त्यानंतर या प्रकरणातील चार आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. या हत्त्या प्रकरणात पोलिसांनी रघू धोत्रे, आदेश धोत्रे, श्याम निगडकर आणि संदीप मोरे या आरोपींना अटक केले होते. परंतु या प्रकरणातील मुख्य आरोपी फरार होता. त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.(Latest Marathi News)

किशोर आवारे हत्या प्रकरणात माजी नगरसेवक चंद्रभान तथा भानू खळदे असल्याचं समोर आलं होतं. परंतु हत्या झाल्यापासून भानू खळदे फरार होता. या प्रकरणी पोलिसांनी विशेष तपास पथकांची निर्मिती केली होती. काल (शनिवारी) पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.(Latest Marathi News)

kishor Aware
Ajit Pawar: एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! अर्थमंत्री पद अजित पवार गटाकडे जाणार?

नाशिकमधून त्याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांना आपले ठिकाण कळू नये म्हणून भानू खळदे नेहमी आपला मोबाइल बंद ठेवत होता. पोलिसांनी त्याचा मोबाइलचे लोकशन सतत तपासले. तर तो नेहमी आपले ठिकाण बदलत होता. खंडाळा, यवत, हैदराबाद, नाशिक असे त्याचे लोकेशन दिसत होते. अखेरी नाशिकमधील सिंधी कॉलनीत त्याचे लोकेशन समजताच पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली आहे.(Latest Marathi News)

kishor Aware
Highest Average Salary : सोलापुरी सगळ्यात भारी! पगार देण्यात देशात ठरलं नंबर वन, मुंबई-पुणे अन् बंगळुरूलाही टाकलं मागे.. जाणून घ्या कसं

तळेगाव नगरपरिषदेचे माजी नगरसेवक भानू खळदे आणि त्याचा मुलगा गौरव खळदे यांनी किशोर आवारे यांच्यात हत्येचा कट रचला होता. काही महिन्यांपूर्वी वृक्ष तोडी प्रकरणावरुन किशोर आवारे आणि भानू खळदे यांच्यात वाद झाला होता.(Latest Marathi News)

याच वादावरून जुन्या नगरपरिषद परिसरात किशोर आवारे यांनी भानू खळदे यांच्या कानाखाली लगावली होती. त्याचाच राग खळदे पिता पुत्रांच्या मनात होता. त्यामुळे भानू खळदे आणि त्याचा मुलगा गौरव याने किशोर आवारे यांची हत्या करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी आरोपींना सुपारी दिल्याचे तपासातून समोर आले आहे.(Latest Marathi News)

kishor Aware
Sharad Pawar : शरद पवारांना मोठा धक्का! माजी केंद्रीय मंत्र्याने सोडली साथ; अजितदादांना दिला पाठिंबा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.