'तुंबलेल्या मोरीतून काहीतर निघेल वाटलं, पण हे तर भाजपचं...'

'बाळासाहेबांनी अनेकांना घडवलं त्यातले एक तुम्ही आहात'
politics
politicsgoogle
Updated on
Summary

'बाळासाहेबांनी अनेकांना घडवलं त्यातले एक तुम्ही आहात'

राज ठाकरे यांनी शिवतीर्थावर केलेलं भाषण भाजपने लिहून दिलं होतं का? लाव रे तो व्हिडिओ गेला कुठे म्हणून आम्हलाही लोकं विचारत असतात. राज ठाकरे तुम्ही शिवसेनेचा द्वेष करण्यासाठी स्वतःचा पक्ष काढला का?, असा खोचक सवाल माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला आहे. मुंबईत शिवसेनेचा द्वेष करून कोणीही मोठे झालेले नाहीत. बऱ्याच मनसैनिकांनी सांगितलं होतं की मोरी तुंबली आहे. त्यामुळं काहीतरी निघेल असं वाटतं होत. मात्र भाजपचं गांडूळ निघालं असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे.

यावेळी राज ठाकरे यांनी केलेल्या आरोपांचा समाचार घेत पेडणेकर म्हणाल्या, राज ठाकरेंना घरच्यांचा इतका द्वेष आहे का? बाळासाहेबांनी अनेकांना घडवलं त्यातले एक तुम्ही आहात. भाजप कुणालाही मांडीवर आणि खांद्यावर घेत नाही. मुंबईत शिवसेनेचा द्वेष करून कोणीही मोठे झालेलं नाही. ठाकरे म्हणून उद्धव ठाकरे यांच्याशी नाळ जोडली असती तर आज सगळं ठीक असतं, असंही पेडणेकरांनी सुचवलं आहे.

politics
अक्कल दाढ उशिरा येते; संजय राऊतांचा राज ठाकरेंना सणसणीत टोला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामांविषयी त्या म्हणाल्या, आज आपण मुख्यमंत्र्यांचं काम पाहिलं आहे. मुंबईकारंसाठी काल चांगला दिवस होता. नववर्षाच्या सुरुवातीला मुख्यमंत्र्यांनी मराठी भाषा भवनचं भूमिपूजन, मेट्रोच लोकार्पण केलं. अजून पुढच्या मेट्रोच लोकार्पण होणार आहे. आम्ही कामाच्या विकासांचा धडा लावला आहे. कोविड कमी होताच लोकार्पणाची कामं सुरु केली आहेत. आम्ही आमच्या कर्मानं लोकांचं भलं कसं होईल याचा विचार करतो आहे. आता अशा लोकांना कोणता चूर्ण देता येईल हे पाहावं लागेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. पुढे पेडणेकर म्हणाल्या, राज ठाकरे यांच्या या वर्तनाने बाळासाहेबांचा उत्तराधिकारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. ज्या पक्षात मुख्यमंत्री युतीत होते त्यात काय घडलं हे सर्वांना माहित आहे.

शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या कारवाई विषयी त्या म्हणाल्या, मी १०० टक्के सांगेन की या कायद्याच्या लढया आहेत. ही लढाई शिवसेना लढणार आहे. जर मुंबईत भ्रष्टाचार दिसतो तर पुण्यातही आहे ते का दिसत नाही. फक्त शिवसेनाच टार्गेटवर आहे का असा सवालही त्यांनी केला आहे.

politics
'ज्यांनी यशवंतराव चव्हाणांच्या पाठीत...' मनसेचा थेट पवारांवर निशाणा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.