मुंबई : तुम्ही हनुमान चालीसा वाचा, आम्ही इंधन दरवाढीबद्दलची हनुमान चालीसा वाचणार आहोत. गॅस सिलिंडरच्या वाढलेल्या दरासंदर्भात चालीसा वाचणार आहोत. दादरमध्ये गोल मंदिरात पठण करण्यासाठी रवी राणा (Ravi Rana) यांनी याव असं आव्हान मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी दिले आहे. तुम्ही आल्यावर कशी दिशा आणि कशी दशा असते हे दाखवते असा इशाराही त्यांनी दिला. हिंदुत्वाचा पुरस्कार करत असाल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) उद्या मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचावी, असं आव्हान आमदार रवी राणा यांनी दिलं आहे. त्याच्या आव्हानाला पेडणेकर यांनी सडेतोड उत्तर दिलं.
त्या म्हणाल्या, कॅमेऱ्याकडे बघून पुस्तक घेऊन आम्ही वाचत नाही. ती तोंडपाठ असावी लागते. झेड सुरक्षेनंतर रवी राणांचं धाडस वाढलं. रवी राणा तुम्ही आमदार आहात, जरा बालिशपणा कमी करा. हे फारच वाढत चाललंय. खारदारकी, आमदारकी घरात आहे म्हणून बालिशपणा करू नका, आपल्या मतदारसंघापुरते मर्यादित रहा असा सल्ला किशोरी पेडणेकर यांनी दिला.
पुढे त्या म्हणाल्या, तुम्ही महाराष्ट्राची चिंता करू नका. बाळासाहेबांचे सुपुत्र मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे महाराष्ट्राला दिशा देत आहेत. याउलट विरोधी पक्ष महाराष्ट्र दिशाहीन करत आहे. त्यामुळे आता बस्स झालं. आम्ही दादरमध्ये पठण करणार आहोत त्याठिकाणी तुम्ही या असे आव्हान त्यांनी यावेळी दिले.
काय म्हणाले रवी राणा
राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मातोश्रीवर हनुमान चालिसेचं पठण करावं. उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरेंचे विचार आणि दिशा विसरले असतील तर आम्ही खासदार आणि आमदार मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठण करू आणि बाळासाहेबांचे विचार जागृत करू, असं रवी राणा म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या घरी हनुमान चालिसेचं पठण व्हायलाच पाहिजे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांच्या घरी हनुमान चालिसा पठण होत नसेल तर ते चुकीचे आहे. उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे विचार विसरले आहेत. ते दुसऱ्या दिशेने भरकटले आहेत आणि त्यांनी बाळासाहेबांच्या विचारावर चालून राज्याला दिशा द्यावी, असं रवी राणा म्हणाले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.