पानिपतावर जिंकण्यासाठी नव्हे तत्वासाठी लढले मराठे; पहिल्यांदाच समोर आलीत धारातीर्थी पडलेल्या सरदारांची नावं 

Know names of Maratha Sardar who sacrificed their Life in Panipat war
Know names of Maratha Sardar who sacrificed their Life in Panipat war
Updated on

नागपूर:  अठराव्या शतकातील सर्वात रक्तरंजीत युध्द हरयाणातील पानिपतावर लढल्या गेले. अफगाणिस्तानचा बादशहा अहमदशहा अब्दाली आणि मराठे यांच्यात १४ जानेवारी १७६१ रोजी भीषण रणसंग्राम झाला. दोन्ही बाजूंनी मोठा संहार झाला. या युध्दात दिल्लीच्या रक्षणासाठी पानिपतावर लढता लढता देह ठेवलेल्या दोनशेपेक्षा जास्त मराठा सरदारांची नावे जगासमोर आली आहेत. विशेष म्हणजे या सर्व सरदारांची नावं पहिल्यांदाच जगासमोर येत आहेत. 

पानिपतावर अनेक बखरी, कादंबऱ्या, पुस्तके लिहिली आहेत. आता जशीजशी ऐतिहासिक साधने, कागदपत्रे, तत्कालीन दस्तावेज हाती लागत आहेत तसा इतिहास समोर येत आहे. पानिपतावरील ताजी बखर २०१४ मध्ये प्रकाशित झाली असून तिचे वैशिष्टय म्हणजे त्यात कल्पनाविलास आढळत नाही. पानिपतावर ज्या काही लढाया झाल्या त्यात कामी आलेल्या सव्वादोनशेच्या आसपास मराठा सरदारांची आडनावासहित नावांचा उल्लेख आहे. 

ही आडनावे वाचल्यानंतर आपल्या पूर्वजांनी केलेला पराक्रम पाहून प्रत्येकाचा उर अभिमानाने भरून येतो. कोल्हापूर संस्थानचे अमात्य कृष्णराव पंडित यांच्यासाठी दरबारी कारकून रघुनाथ यादव चित्रगुप्त याने बखर पानिपत ची या नावाने दस्तावेज लिहिला. इतर बखरी गोपिकाबाई पेशवा यांच्यासाठी लिहिल्या होत्या. अर्थात त्यात विश्वासराव, भाऊसाहेब पेशवे, देवधर्म, तिर्थयात्रा याचेच रसभरीत वर्णन केल्याचे आढळते. चित्रगुप्ते यांनी १७६१ मध्येच लिहिलेल्य़ा बखरीत तत्कालीन राजकारण, परिस्थिती आणि प्रत्यक्ष युध्द यांचे वर्णन केले आहे. मो़डी लिपीत असलेला हा दस्तावेज इंग्रजांनी इंग्लंडला नेला. कागदपत्रे शोधण्यासाठी इतिहासकार उदय एस. कुलकर्णी २०१३ मध्ये इंग्लंडला गेले. रॅायल एशियाटीक सोसायटी अॅोफ ग्रेट ब्रिटन अॅण्ड आयर्लंड च्या माध्यमातून कुलकर्णी यांची कागदपत्रे मिळविली. 

या मोडी लिपीतील कागदपत्रांचा अनुवाद करीत उदय कुलकर्णी यांनी पानिपतावर लढलेल्या मराठा सरदारांची नावे जगासमोर आणली. विशेष म्हणजे या बखरीत अहमदशहा अब्दालीच्या सैन्यातील ठार झालेल्या २१० उजबेक, अफगाणी पठाण, रोहिले या मुस्लिम तर अब्दालीच्या बाजूने लढणारे राजपूत, भील, राठवड , पंजाबी या हिंदू सरदारांची नावे सुध्दा आहेत. उत्तरेतील मुस्लिम तर सोडा हिंदू राजे, सरदारांनीही मराठ्यांना मदत न केल्याने मराठे हे युध्द हरले.

पानिपतावर हुतात्मा झालेले मराठा सरदार...

पेशवे, सदाशिवराव भाऊसाहेब, विश्वासराव पेशवे, पहिले बाजीराव पेशवे यांचे पूत्र समशेर बहाद्दर, दत्ताजी शिंदे, जनकोजी शिंदे, यशवंतराव पवार, इब्राहिम खा गारदी, हसन खा, फरदुल्ला खा, रहिमत खा, दमाजी व बाबूराव गायकवाड, धनाजी पवार, नरसिंगराव इंगळे, धनाजी वागमोडे, निठ्ठल सिवदेव, राणोजी पवार, महिपतराव चिटणवीस . त्रिंबकराव सदाशिव, गोविंदपंत बुंदेले, अंताजी मानकेश्वर, बळवंतराव मेहंदळे, सोनजी भापकर, संताजी आटोले, गोविंदराव निंबालकर, दत्ताजी वाघ, संक्राजी घाटगे, बुधकर, मानसिंगराव खुले, मानाजी बंडगर, बलवंतराव गणपत, गोंदजी कणसे, गंगाधर नारायण, दामोदर पवार, तावजी ताठे, संताजी नलगे, धर्माजी पवार, रामराव माने, भालाजी भोईटे,भयाजी निगडे, भिमाजी निगडे, कोमजी निगडे, धोंडजी निगडे, नारो हरी, सटवाजी पिसाळ, रायाजी मेमाने, लिंगोडी धनवट, तुकोजी खरात, कृष्णाजी मोरे, ज्ञानसिंग, नारायण गरूड, कान्होजी बिरजे, देविदास रजपूत, हाणमाजी मोरे, बाबाजी मोहिते, बापूजी काटकर, चिमणाजी बनके, संताजी ढवळे, सिवाजी आबीटकर, लखमोजी गाटे, जन्याजी मोरे, अप्पाजी बलदेव, मल्हारजी वाघ, गोपालजी माने, सोमाजी सेलके, निंबाजी पडवळ, अमरोजी चव्हाण, कृष्णाची काटे, मानाजी घोरपडे, अनसोजी भोरकर, नागोजी दळवी, अनाजी घाटगे, पदोजी पाटनकर, दत्ताजी पवार, आनंदराव चिमणाजी, लखमोडी गाजरे, मल्हारजी माने, रहिमान गोरी, राणोजी काटकर, भीमाजी पांढरे, अमृतराव निकम, गोविंद नारायण, अनोजी पवार, कमलोजी साटे, आपोजी दुगडे, आबाजी साबाजी, शहाजी मोहिते, बहिरजी बागवे, निमाजी अनंत, लिंगो विश्वनाथ, रघोजी शिर्के, नारायणरावजी बनकर, अप्पाजी नलगे, गिरमाजी माने, आनंदराव परभू, बाबूराव परभू, सोमाजी गरूड, कुसाजी ताटे, बलवंतसिंग, भरमोजी अहेर, येसाजी खंडेराव परभू, आनसोजी तांबे, सुभाजी मोरे, सिवजी पाटे, कमलोजी निजसुरे, नारो विठ्ठल, कोमजी निगडे, घुमाजी मांडवे, हणमाजी मचाले, कोंबजी मजाले, देसोजी घाटे, गिरसोजी देवणे, हारजी जांबले, कृष्णाजी भापकर, संताजी पासलकर, अप्पाजी भालेकर, गणोजी निकम, बाबुराव बिरजे, विसंभर हरी, आनोजी मोटे, रघोजी भोसले, शामराव शिर्के, गणोजी भागे, पिराजी मोहिते, वेंकटराव पडवळ, संताजी आटवल, दत्ताजी भोसले, गणोजी खिरात, जाणोजी पाटणकर, मानाजी पायगुडे, माणकोजी पायगुडे, बहिरजी चव्हाण, तानकोजी बनगर, कानहोजी रणदिवे, गोपालजी सांबरे, निमाजी केशव, चंद्रराव तांबे, भाष्कर गोविंद, सयाजी पाटे, अप्पाजी, केरोजी चव्हाण, राणोजी आगलावे, भारमाजी गाडे, तयाजी सलगर, येसाजी ढमढेरे, अनाजी ढमढेरे, दयालसिंह, मणीराम सिंग, कृष्णाराम बहिरव, बिंबाजी पवार, मानाजी तुंग, सटवाजी तुंग, नरसोजी चोपडे, दिनानाथ बंड, सावजी दामगुडे, संकराजी शिंदे, अवजी विठ्ठल, नावजी भोरकर, सिवाजी सकपाळ, दमाजी आंगरे, गणजी भालेकर, हरी विसाजी, केरोजी निकडे, तानको गणेश, लखमोजी सावंत, बहिरराव सेडगे, परसोजी गाटे, खंडेराव, बयाजी सिर्के, माधोराम, दौलतराम तांबे, हासन इनायत, धावजी माने, गिरधर गणेश, अप्पाजी पवार, गमाजी मोहिते, गंगाजी दाभाडे, सिवराम माधव, अप्पाजी बंड, हैबतराव माने, शामराव यादव, अनाजी पोटले, भानजी मोहिते, सिवाजी भापकर, आकोजी मोहिते, देवराव हुले, हरी गोविंद, विठोजी तिवरे, सदाशिव यशवंत, नरसोजी पवार, आवजी पाटोले, धर्माजी पवार, दामाजी नरहरी, पिलाजी जटार, गणोजी मोजर, गणोजी थोरात, सयाजी थोरात, आधोजी मोरे, बाबुराव सेडगे, मयाजी जांबले, मनोहरसिंग, सर्जाराव जाधव, नायकजी माधव, केशव नारायण, रामराव विठ्ठल परभू, रामराव शामजी रणदिवे, बलराम राजपूत. अबाजी मोहिते, जान महमद, लिंगोजी धरमाजी, भवानी धनवट, भगीरथराम, चिंतामण राव, मोटाजी साटम, सिवाजी सिरसाट, भरमाजी वग, अंताजी नरसिंघ, येमाजी गोफणे, भीवराम हरी, अहिलोजी मोरे, दामोदर सिंग, कर्णाजी पवार, नेमाजी माने, निबाजी वग, येशवंतराव पवार, आपाजी पाटणकर, संताजी काटे, राघोजी घाटणे, येमाजी भापकर, नायकजी घोरपडे, नरसोजी सिंदे, सयाजी सालोखे, नारो नरहर, विसाजी राम, लक्षमण केशव, नंदराम रजपूत.

अवमान नव्हे स्वाभिमान...

पानिपतचे युध्द आतापर्यंत अपमानास्पद समजल्या जात होते. पण हा मराठ्यांसाठी गौरवाचा बिंदू आहे. या युध्दावर अनेक म्हणी दृढ झाल्या. जसे संक्रात कोसळली, विश्वास गमावला आदी. पण जर राजवाड्यासारख्या इतिहासकारांनी उच्चवर्ण आणि धर्माच्या दृष्टीकोनातून जर इतिहासाकडे पाहिले असेल तर असेच होणार. पण आता खरा आणि सत्य इतिहास बाहेर पडत आहे. महाराष्ट्रासाठी अभिमान आणि गर्वाने मान उंच हाेईल असे पानिपतचे युध्द होते. महाराष्ट्र सोडून अवघा भारत भेकडासारखा वागला. मराठे लढत,मरत असताना राजपूत, जाट, बुंदेले, शीख, भैय्ये शेपूट घालून बसले होते. मनात आणले असते तर मराठे पळ काढू शकले असते अथवा अहमदशाह अब्दालीला पंजाब आणि दिल्ली देऊन युध्द टाळू शकले असते. पण हे युध्द भूमी जिंकण्यासाठी नव्हे तर मराठे तत्वासाठी लढले. मरेन पण हटणार नाही हेच या युध्दातून मराठ्यांनी जगाला दाखवून दिले.

संपादन - अथर्व महांकाळ 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()