Bike Taxi Service : परवडणारी 'बाईक टॅक्सी' लवकरच होणार सुरू; किती असेल भाडे? जाणून घ्या नियम

Regulations for bike taxi service in Maharashtra : बाइक टॅक्सी सुरू करण्याबाबतच्या प्रस्तावाला राज्य सरकारने मान्यता दिली होती. सरकारच्या निर्देशानुसार परिवहन विभागाने राज्य सरकारला नियमावली सादर केली आहे.
Regulations for bike taxi service
Regulations for bike taxi service
Updated on

मुंबई : राज्यात बाइक टॅक्सी सेवा सुरु करण्यासाठी अर्जदारांना सहा लाख रुपये खर्च येणार आहे. यामध्ये एक लाख शुल्क तर पाच लाख सुरक्षा अनामत रक्कम असणार आहे. तसेच संबंधित अर्जदाराकडे १०० दुचाकी वाहने असणे आवश्यक आहे. ‘ॲग्रीगेटर’चे  नियम त्यांना लागू असणार आहे. प्रवासी विम्यासह इतर नियमांचा यात  समावेश असेल.   

बाइक टॅक्सी सुरू करण्याबाबतच्या प्रस्तावाला राज्य सरकारने मान्यता दिली होती. सरकारच्या निर्देशानुसार परिवहन विभागाने राज्य सरकारला नियमावली सादर केली आहे. येत्या दीड महिन्यात बाइक टॅक्सी रस्त्यावर धावेल, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

राज्यात ज्या ठिकाणी वाहतुकीचे पर्याय व सोयी कमी आहेत किंवा वाहतूककोंडी होते अशा ठिकाणी बाइक टॅक्सीला परवानगी देण्यात यावी, अशी सूचना झा समितीच्या अहवालात होती. मात्र राज्य सरकारने ग्रामीण भागासह शहरी भागातही बाइक टॅक्सी चालविण्यास मंजुरी दिली होती.

‘‘एका व्यक्तीला प्रवास करायचा असेल तर बाइक टॅक्सीचे भाडे कमी आहे. तसेच बाइक टॅक्सी रिक्षा किंवा टॅक्सीच्या तुलनेत कमी जागा व्यापते. चालक दारावर येणार असल्याने प्रवाशांचा वेळ वाचेल. लोकांना तत्पर सेवा मिळेल तसेच प्रवाशाला कमी वेळेत आपल्या ठिकाणी पोचता येईल,’’ असे परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

Regulations for bike taxi service
Mumbai Rain Alert : मुंबईत उद्या हवामान कसे असेल? हवामान विभागाने वर्तवला 'हा' अंदाज

नियमावली


-रिक्षासाठीचे नियम लागू असणार
-भाडे रिक्षापेक्षा कमी
-परिवहन संवर्गात नोंदणी
-क्रमाकांची पाटी पिवळ्या रंगात
-दुचाकीसाठी विशिष्ट रंग ठरवणार
-वाहन चालकाला बॅचची सक्ती
-पोलिस पडताळणीत चालक पात्र ठरला तरच बॅच मिळणार

Regulations for bike taxi service
VIDEO : कपडे फाटोस्तर हाणामारी! धैर्यशील मानेंचा ड्रायवर अन् आमदार आवाडेंच्या पुत्राचा ड्रायव्हर एकमेकांना भिडले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()