पिवळ्या रंगाची बेडकं नजरेस पडताहेत? जाणून घ्या रंजक माहिती

पिवळ्या रंगाची बेडकं नजरेस पडताहेत? जाणून घ्या रंजक माहिती
Updated on

कोल्हापूर : पहिल्या पावसास सुरुवात होताच आपाल्या कानावर आवाज येतो तो 'डराव डराव' चा. संपूर्ण ऋतूत बेडकांचा(frog) हा आवाज आपल्याला ऐकायला मिळतो. पिवळ्या रंगाची बेडूकं आपल्याला पाहायला मिळतात. अशीच काही बेडकं सांगली जिल्ह्यात आढळलीत. तेथे एका डबक्यात चक्क बेडकांची शाळाच भरली आहे. पिवळ्या रंगाचे या बेडकाचे आकर्षण बालचमू बरोबर मोठ्यांनाही लागले आहे. का बरं या बेडकांना पिवळा रंग आला असेल. आणि आताच ती का जास्त दिसतात. जाणून घेऊया बेडकांचे लाईफ सर्कल.(know-why-frog-colour-yellow-life-cycle-information)

पावसाळ्याच्या पहिला आठवड्यातच आपल्याकडे बेडकांचा फौजफाटा पाहायला मिळतो.बेडूक हा उभयचर प्राणी आहे.अन्नसाखळीतील हा महत्त्वाचा घटक समजला जातो. हा शीत रक्ताचा प्राणी असल्याने त्याच्या शरीराचे तापमान सभोवतालच्या तापमानानुसार बदलत असते. बेडकाचा समावेश उभयचर वर्गाच्या ॲन्यूरा गणातील रॅनिडी कुलात करण्यात येतो.जगात त्यांच्या 4800 जाती आहेत. तर भारतामध्ये 276 जाती दिसून येतात. बेडूक हे सापाचं खाद्य आहे. तर सांडपाण्यावर बसणाऱ्या डासा, डासांची अंडी, कीटकनाशके हे बेडकाचे खाद्य आहे. एवढेच नाही तर गोव्यामधील काही हॉटेलमध्ये बेडकाचे सुप देखील बनविले जाते.

बेडकांची लाईफ सर्कल

बेडूक हा खरतर निद्रा अवस्थेत असणारा प्राणी आहे. तो केवळ पावसाळ्यामध्ये वीस ते पंचवीस दिवस पाण्यात राहतो. इतर वेळेला तो जमिनीखाली राहतो. महाराष्ट्रात यांच्या अनेक प्रजाती आहेत. तो प्रदेशानिष्ठ आहे. बेडकांच्या जातीमध्ये काही बेडूक झाडावर असतात ,काही जमिनीत असतात , काही पाण्यावर तर काही पठारावर आढळतात. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बेडूक हा आपला मीटिंग पिरेड करत असतो. या दिवसांमध्ये पाण्यामध्ये अंडी घालत असतो. बेडकांच्या अनेक प्रजाती आहेत. त्याची नोंद देखिल होत आहे.यामध्ये बुल फ्रॉग, मलबार ग्राइंडिंग फ्रॉग, कोयना तोड,टॅडपोल्स विषयी जाणून घेउया.

बुल फ्रॉग: पावसाळ्याच्या दिवसांमध्ये हा बेडूक पिवळ्या रंगाचा दिसतो. साधारणता एक महिना याचा रंग पिवळा असतो. या दिवसात त्यांचा मेटिंग सीजन असतो. पिवळा बेडूक हा नर असतो. तर राखाडी कलरची मादी असते.पिवळा बेडूक हा मादीपेक्षा आकाराने लहान असतो. तर मादी आकाराने मोठी असते. मादीला आकर्षित करण्यासाठी तो मोठ्याने आवाज काढत असतो. या पंचवीस दिवसाच्या काळामध्ये ही बेडूक अंडी घालतात. एक महिन्यानंतर पिवळ्या बेडकाचा कलर हा राखाडी कलर सारखा परत होतो.

मलबार ग्लायडिंग फ्रॉग :

हा बेडूक उडणारा असतो. एका झाडावरून दुसऱ्या झाडावर तो उड्या मारत असतो. आंबोली, कोकणात हा बेडूक साधारणतः दिसून येतो. याच्या पायाला पडदे असतात. त्याच्या पायाचा रंग हा लाल असतो तर त्याचा वरचा रंग शेवाळी असतो.

कोयना टोड फ्रॉग: हा बेडूक सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या पठारावर आढळतो. याची स्किन खरबरीत असते.

आंबोली टोड फ्रॉग : हा बेडूक आंबोलीत आढळतो याची स्किन खरबरीत असते.

टॅड पोल्स: टॅड पोल्स म्हणजे बेडकाची पिल्ले. ही जेव्हा अंड्यातून बाहेर येतात तेव्हा त्यांना शेपूट असते.नंतर त्याला पाय यायला सुरुवात होते.

बेडूक हा सेंसिटिव्ह प्राणी आहे. वातावरणातील बदल तो इंडिकेट करतो. खरंतर तो शेतकऱ्याचा ही मित्र आहे. मात्र शेतामध्ये पेस्टिसाइड व केमिक्लसमुळे बेडकांची संख्या सध्या कमी होत चालली आहे. ते टिकवणे काळाची गरज आहे.

बेडकाचा आधिवास नष्ट होत चालला आहे. यासाठी अनेक पर्यावरणवादी संघटना पुढाकार घेत आहेत. पर्यावरणामध्ये अन्न साखळीतला महत्त्वाचा घटक असल्यामुळे बेडकाचा आधिवास टिकणे गरजेचे आहे.

रमण कुलकर्णी, मानद वन्यजीवरक्षक कोल्हापूर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.