मुंबई - मान्सून तोंडावर आलेला असून कोकण रेल्वेने पाणलोटाची साफसफाई, रेल्वे मार्गावर भू-सुरक्षा कार्ये अशी महत्त्वाची कामे नुकताच पूर्ण केली आहे. तसेच यंदा पावसाळ्यात अतिवृष्टी अथवा दृश्यमानता कमी असल्यास गाड्यांचा वेग ताशी ४० किमी ठेवण्याच्या सूचना रेल्वे गाड्यांचा लोको पायलेट यांना देण्यात आले आहे.
दरवर्षी कोकणात सर्वाधिक पाऊस कोसळतोय. या पावसातही रेल्वे गाड्या सुरक्षित आणि सुरळीत सुरु राहाव्यात. त्यासाठी कोकण रेल्वेकडून दरवर्षी मान्सून पूर्व कामे हाती घेतली जाते. यंदाही कोकण रेल्वेने पाणलोटाची साफसफाई, रेल्वे मार्गावर भू-सुरक्षा कार्ये अशी महत्त्वाची कामे नुकताच पूर्ण केली आहे. यासोबत अतिवृष्टी अथवा दृश्यमानता कमी असल्यास गाड्यांचा वेग ताशी ४० किमी ठेवण्याच्या सूचना लोको पायलेट यांना देण्यात आल्याचे कोकण रेल्वेकडून सांगण्यात आले.
याशिवाय पावसाळ्यात कोकण रेल्वे मार्गावर मान्सून वेळापत्रक लागू केल्या जातात. कारण मुसळधार पाऊस आणि दरडी कोसळण्याची भीती असल्याने प्रवासी सुरक्षिततेच्या दृष्टीने कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या सर्वच मेल- एक्सप्रेस गाड्यांचा वेगावर मर्यदा आणली जाते.
पावसाचा अचूक अंदाज -
दरवर्षी पावसाळ्यात मुसळधार पाऊस पडल्यानंतर कोकण रेल्वे मार्गावरील वाहतुकीचे तीनतेरा वाजले होते. त्यामुळे रेल्वे वाहतुकीवर देखील मोठा होतो. मात्र, आता पावसाची अचूक मोजणी, वादळवाऱ्याचा वेग व पर्जन्यमानाच्या अचूक नोंदीं ठेवून रेल्वेची वाहतुक सुरळीत सुरु ठेवण्यासाठी कोकण रेल्वेने ९ स्थानकावर स्वयंचलित पर्जन्यमापक यंत्र बसविण्यात येत आहे. त्यामुळे कोकण रेल्वेला पावसाळ्यात पावसाची अचूक नोंदी घेण्यात येणार आहे. तसेच नियोजन करण्यास मदत होणार आहे.
या स्थानकांवर -
माणगाव, चिपळूण, रत्नागिरी, विलवडे, कणकवली, मडगाव, कारवार, भटकळ आणि उडुपी या नकावर स्वयंचलित पर्जन्यमापक यंत्र बसविणार आहे.
या उपाययोजना राबवण्यात येणार
- सतत मान्सून पेट्रोलिंग
- ६७३ जवान असुरक्षित ठिकाणी गस्त घालणार
- २४ तास स्टेशनरी वॉचमन तैनात केला जाणार
- रेल्वे गाड्यावर वेगावर निर्बंध लादले जाणार
- आपत्कालीन वैद्यकीय पथक तैनात असणार
- लोको पायलट आणि गार्ड्ला वॉकी-टॉकी सेट देणार
- आप्तकानीन संवाद यंत्रणा (ईएमयू) सॉकेट्स १ किमी अंतरावर
- ३ ठिकाणी पुलांसाठी पूर चेतावणी प्रणाली सुविधा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.