KDCC Result :आबिटकर विजयी, आवाडेंचा ‘करेक्ट कार्यक्रम’

पतसंस्था गटाचा निकाल ः हसन मुश्रीफांना शह
prakash aawade
prakash aawadesakal
Updated on

Prakash Awadeकोल्हापूर: जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून राहीलेल्या नागरी बँक-पतसंस्था गटात विरोधी गटाचे उमेदवार व आमदार प्रकाश आबिटकर (Prakashrao Abitkar) यांनी एकतर्फी विजय मिळवत या गटातील सत्तारूढ गटाचे उमेदवार आमदार प्रकाश आवाडे (Prakash Awade)यांना धक्का दिला. या गटात आवाडे यांचाच ‘करेक्ट कार्यक्रम’ केल्याची चर्चा आहे. या गटातील विद्यमान संचालक अनिल पाटील यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली.

prakash aawade
KDCC Result : यड्रावकर, गायकवाड आमच्यासोबतच; मंडलिकांचा दावा

आबिटकर यांना ६१४ तर श्री. आवाडे यांना ४६१ मते मिळाली. अनिल पाटील यांना १०६ मते पडली. या गटातील १२२१ मतदारांपैकी १२०४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. या गटातून सत्तारूढ आघाडीतून उमेदवारी मिळावी यासाठी आबिटकर यांचे प्रयत्न सुरू होते, पण त्यांना डावलून सत्तारूढ गटाने आवाडे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज झालेल्या श्री. आबिटकर यांनी प्रा. मंडलिक यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेच्या पॅनेलमधून उमेदवारी मिळवली व एकतर्फी विजय मिळवून मुश्रीफ यांच्यासह सत्तारूढ गटाच्या नेत्यांना एकच धक्का दिला.

या गटातून विजयाची खात्री असल्याने श्री. आवाडे यांनी कालच फेसबुक पोस्ट टाकून गुलाल उधळायला बंगल्यावर या असा संदेश व्हायरल केल्याची चर्चा होती. पण त्यांचा या गटात दारूण पराभव झाला. या गटातून श्री. आबिटकर हे ‘जायंट किलर’ ठरले, त्यांनी श्री. आवाडे यांच्यासह सत्तारूढ गटाच्या नेत्यांनाच एकप्रकार धोबीपछाड दिल्याचे बोलले जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()