KDCC Result : यड्रावकर, गायकवाड आमच्यासोबतच; मंडलिकांचा दावा

प्रा. मंडलिक यांचा दावा ः दोन्ही उमेदवार शिवसेनेचेच
KDCC Result : यड्रावकर, गायकवाड आमच्यासोबतच; मंडलिकांचा दावा
Updated on

कोल्हापूर : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सत्तारूढ गटातून विजयी झालेले राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर (Rajendra Patil Yadravkar)व शाहुवाडी विकास संस्था गटातील विजयी उमेदवार रणवीर गायकवाड (Ranveer Gaikwad) हे बँकेच्या राजकारणात आमच्यासोबत असतील असा दावा विरोधी पॅनेलचे प्रमुख खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी केला. दरम्यान, निकालानंतर मंडलिक (Sanjay Mandlik)यांनी रणवीर व डॉ. यड्रावकर यांचे फोनवरून अभिनंदन केले. (Kolhapur District Bank Election 2022)

यड्रावकर हे सत्तारूढ गटातून विजयी झाले असले तरी राज्य सरकारमध्ये त्यांना शिवसेनेच्या कोट्यातून मंत्रीपद दिले आहे. त्यांनी आमच्यासोबत यावे यासाठी प्रा. मंडलिक यांचे प्रयत्न सुरू होते. जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी तर त्यांच्यावर टीका करून त्यांनी शिवसेनेशी गद्दारी केल्याचा आरोप केला होता. आता विजयानंतर मात्र यड्रावकर हे आमच्यासोबत राहतील असे सांगून प्रा. मंडलिक यांनी खळबळ उडवून देतानाच एकप्रकारे सत्तारूढ गटाचे नेते ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनाच शह देण्याचा प्रयत्न केला आहे.

KDCC Result : यड्रावकर, गायकवाड आमच्यासोबतच; मंडलिकांचा दावा
KDCC Result :आबिटकर विजयी, आवाडेंचा ‘करेक्ट कार्यक्रम’

शाहुवाडी विकास संस्था गटातील विजयी उमेदवार रणवीर गायकवाड यांना शिवसेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर यांनी पाठिंबा दिला होता. या जोरावर श्री. गायकवाड हेही आमच्यासोबत राहतील असा दावा प्रा. मंडलिक करत आहेत. तथापि श्री. गायकवाड यांचे वडील मानसिंगराव हे राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष आहेत, या तालुक्यात मैत्रीपूर्ण लढत असल्याने पॅनेलचे चिन्ह नव्हते, अशा परिस्थितीत श्री. गायकवाड यांची भुमिका महत्‍वाची ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.