सत्ताधारी पॅनेलच्या सर्वच्या सर्व जागा विजयी,अध्यक्ष निवड बाकी

मंत्री हसन मुश्रीफ यांना विश्वास; सेनेच्या स्थानिक नेत्यांनीच मांडला सवतासुभा
hasan mushrif
hasan mushrifsakal
Updated on

कोल्हापूर : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी बॅकेच्या (Kolhapur DCC Bank Election)निवडणुकीत विरोधकांनी का पॅनेल उभे केले आहे, माहिती नाही. आमचा सर्व तालुक्यांचा दौरा पूर्ण झाला आहे. मतदारांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे सत्ताधारी पॅनेलच्या सर्वच्या सर्व जागा विजयी झाल्या आहेत. या विजयाची फक्‍त औपचारिकता आणि अध्यक्ष निवड बाकी आहे, असल्याचे सांगत जिल्‍हा बँकेवर पुन्‍हा सत्ताधारीच येणार असा विश्‍‍वास राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि जिल्‍हा बँकेच्या सत्ताधारी गटाचे नेते हसन मुश्रीफ (Hasan MUshrif)यांनी व्यक्‍त केला.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘‘शिवसेनेला (Shivsena) सत्ताधारी पॅनेलमधून वगल्याचे सांगितले जात आहे, मात्र त्यात तथ्य नाही. शिवसेनेला आम्‍ही वगळलेले नाही. सेनेचे यापूर्वी दोन संचालक होते. त्यांना आणखी एक जागा देण्याचे मान्य केले होते. ही जागा स्‍वीकृत संचालकाची होती. शिवसेनेच्या राज्यातील नेत्यांनीही त्याला संमती दिली होती. मात्र स्‍थानिक नेत्यांशी चर्चा करून तोडगा काढण्यास त्यांनी सुचवले होते. मात्र स्थानिक नेत्यांनीच स्‍वतंत्र लढण्याची भूमिका घेतली. त्यामुळे ही निवडणूक लागली.’’

मुश्रीफ म्हणाले, ‘‘खरे तर विरोधी पॅनेलमध्ये खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांना जबदरस्‍तीने ओढण्यात आले आहे. त्यांना सत्ताधाऱ्यांनी उमेदवारी देण्याचे मान्य केले होते. मात्र सेनेतील काहींनी त्यांच्यावर दबाव टाकला. काही राक्षसी महत्त्वावकांक्षेच्या लोकांनी ही निवडणूक लावली आहे. मात्र हा नेता कोण याबाबत, समय समय की बात है, असे सांगत नावाबाबतचा सस्‍पेन्‍स कायम ठेवला.’’

निवडणुकीत आमदार विनय कोरे (Vinay Kore) यांना खूप महत्‍व दिल्याचे बोलले जात आहे, याबाबत बोलताना मुश्रीफ म्हणाले, ‘‘आमदार विनय कोरे हे बँकेच्या निवडणुकीत नेहमीच सत्ताधाऱ्यांयांसोबत राहिले आहेत. यापूर्वीही त्यांना एक जागा देण्यात आली होती. त्यामुळे त्यांच्यामुळे विरोधात पॅनेल तयार झाले, असे जे काही बोलले जात आहे किंवा चर्चा केली जात आहे, त्यात काहीही तथ्य नाही.’’

hasan mushrif
सेनेचे मुख्यमंत्री असताना मराठी अधिकाऱ्यांवर होतोय अन्याय

लोकांच्या भेटीगाठी झाल्या

विरोधी पॅनेलमुळे सत्ताधाऱ्यांना पायाला भिंगरी बांधावी लागली असल्याचे विरोधक सांगत आहेत, यावर बोलताना मुश्रीफ म्हणाले, ‘‘गेल्या ३०,३५ वर्षात जिल्‍हा बँकेतूनच निवडणुकीची सुत्रे फिरत होती. कधीही तालुक्यांना जाऊन प्रचार करावा लागला नाही. यावेळी विरोधकांनी पॅनेल केल्याने सत्ताधारी मंडळींना तालुक्यातून मेळावे घ्यायला फिरावे लागत आहे, ही वस्‍तुस्‍थिती आहे. खरेतर दोन वर्षांपासून कोरोना असल्यामुळे लोकांच्या भेटीगाठी झालेल्या नाहीत. निवडणुकीच्या निमित्ताने आता लोकांना भेटायला मिळत आहे. त्यामुळे विरोधी पॅनेलचेच आभार मानत असल्याचा टोला मंत्री मुश्रीफ यांनी लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.