18 जागा जिंकून सत्तारूढचा एकतर्फी विजय; शिवसेनेचा 3 जागांवर कब्जा

सत्तारूढ गटाच्या सहा जागांच्या उमेदवारांची यापूर्वीच बिनविरोध निवड झाली आहे.
18 जागा जिंकून सत्तारूढचा एकतर्फी विजय; शिवसेनेचा 3 जागांवर कब्जा
Updated on

कोल्हापूर : राज्यात लक्षवेधी ठरलेल्या कोल्हापूर जिल्हामध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या (केडीसीसी) निवडणूकीत (KDCC Bank Elections Result)सत्तारूढ आघाडीने 21 पैकी 18 जागा जिंकून एकतर्फी विजय मिळवला आहे. तर दिग्गिज नेत्यांना टक्कर देत शिवसेनाप्रणित (Shivsena) समविचारी आघाडीने 3 जागा काबिज केल्या आहेत. सत्तारूढ गटाच्या सहा जागांच्या उमेदवारांची यापूर्वीच बिनविरोध निवड झाली आहे. पतसंस्था गटातून आमदार प्रकाश आबिटकर (Prakashrao Abitkar) यांचा भाऊ प्रा. अर्जुन आबिटकर यांनी आमदार प्रकाश आवाडे (Prakasha Aawade) यांना पराभवाचा धक्का देत बॅंकेत संचालक म्हणून प्रवेश केला. तर प्रक्रिया गटातील निवडणूक ही नूरा कुस्तीप्रमाणे होणार असल्याची चर्चा होत होती.

दरम्यान, खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik)आणि जिल्हा बॅंकेचे संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर (Babasaheb Patil-Asurlekar)यांच्या विजयामुळे या चर्चेवर शिक्का मोर्तब झाले आहे.

कसबा बावडा रमण मळा येथील शासकीय धान्य गोदाममध्ये आज सकाळी 8 पासून मतमोजणी सुरु झाली. दुपारी मतमोजणी संपली. त्यानंतर विजयी उमदेवारांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत आपआपल्या नेत्याचा जयघोष करत गुलालाची उधळण केली.

कोल्हापूर जिल्हा बॅंकेसाठी बुधवारी (ता. 5) चुरशीने 98 टक्के मतदान झाले. 15 जागांसाठी 33 उमेदवार रिंगणात होते. यासाठी 7 हजार 498 मतदारांनी मतदान केले होते. आज सकाळी 8 ते 9.30 दरम्यान, सर्व टेबलवर गटनिहाय मतपत्रिकेचे वाटप करण्यात आले. कडाक्‍याच्या थंडीतही अधिकारी आणि त्यांच्यासोबत उमेदवारांचे कार्यकर्ते मतमोजणी ठिकाणी हजर झाले. पहिला निकाल आजरा विकास संस्था गटाचा जाहीर झाला. यामध्ये सत्तारूढ गटाचे सुधीर राजाराम देसाई हे 57 मते घेवून विजयी झाले. तर, त्यांचे विरोधी उमेदवार 48 मते मिळाली आहेत. त्यानंतर भुदगड विकास संस्थेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये माजी आमदार के. पी. पाटील यांचा मुलगा रणजितसिंह पाटील (सत्तारूढ) विजयी झाले.

रणजितसिंह पाटील यांना 144 मते तर यशवंत केरबा नांदेकर (विरोधी गट) यांना 62 मते मिळाली. नागरी सहकारी बॅंका, पतसंस्था गटातून माजी आमदार प्रकाश आवाडे यांना पराभूत करून विरोधी आघाडीचे व आमदार प्रकाश आबिटकर यांचे भाऊ प्राचार्य अर्जुन आबिटकर विजयी झाले. आबिटकर यांना 613 तर आवाडे या 463 मते मिळाली. याच गटातील अनिल पाटील यांना 107 मतांवर समाधान मानावे लागले. सर्वात चुरशीची आणि लक्षवेधी ठरलेली कृषि पणन संस्था व शेतीमाल प्रक्रिया संस्था गटामध्ये विरोधी आघाडी पॅनेल प्रमुख खासदार संजय मंडलिक व बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांनी सत्तारूढ गटाच्या प्रदिप पाटील व मदन कारंडे यांच्यावर दणदणीत विजय मिळवला.

18 जागा जिंकून सत्तारूढचा एकतर्फी विजय; शिवसेनेचा 3 जागांवर कब्जा
वडिलांच्या पराभवाची व्याजासह परतफेड; गायकवाडांचा दणदणीत विजय

खासदार मंडलिक यांना 306, बाबासाहेब पाटील यांना 329, प्रदिप पाटील-भुयेकर यांना 119 तर मतदान कारंडे यांना 122 मते मिळाली आहेत. इतर शेती संस्था व व्यक्ति सभासद गटातून सत्तारूढचे प्रदिप उर्फ भैय्या माने 2265 मते घेवून विजयी झाले. त्याच्या विरोधी उमदेवार क्रांतीसिंह संपतराव पवार-पाटील यांना 1655 मते मिळाली. गडहिंग्लज संस्था गटात संतोष पाटील 100 मते घेवून विजयी झाले. तर माजी बॅंकेचे माजी उपध्याक्ष अप्पी पाटील यांना केवळ 6 मतांवर समाधान मानावे लागले. पन्हाळा संस्था गटात आमदार विनय कोरे 204 मते मिळवून विजयी झाले. तर विरोधी विजयसिंह पाटील यांना 38 मते मिळाली. शाहू संस्था गटातून अपक्ष उमेदार रणवीरसिंह गायकवाड 66 मते घेवून विजयी झाले. तर सर्जेराव पाटील-पेरीडकर यांना 33घेवून पराभूत झाले. जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या शिरोळ संस्था गटातून आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर 98 मते मिळवून विजयी झाले. त्यांच्याविरूध असणारे गणपतराव पाटील यांना 51 मते मिळाल्याने पराभव पत्कारावा लागला.

18 जागा जिंकून सत्तारूढचा एकतर्फी विजय; शिवसेनेचा 3 जागांवर कब्जा
KDCC बँकेचा निकाल वाचा एका क्लिकवर

महिला राखीव गटामध्ये श्रुतिका शाहू काटकर 4575 व माजी खासदार निवेदिता माने 4149 मते घेवून विजयी झाल्या. तर त्यांच्याविरोधात असणाऱ्या लतिका पांडूरंग शिंदे यांना 2966 व रेखा सुरेश कुऱ्हाडे यांना 2079 मते घेवून पराभव पत्कारावा लागला. अनुसुचित जाती व जमाती गटात आमदार राजू आवळे 5002 मतांनी विजयी झाले, तर उत्तम कांबळे 2393 मतांनी पराभूत झाले. विमुक्त जमाती व विशेष मागास प्रवर्गमध्ये स्मिता गवळी यांनी पहिल्याच टर्ममध्ये बाजी मारत 4887 मते मिळवून विजयी झाल्या. तर त्यांच्या विरोधी विश्‍वास जाधव हे 2495 मते घेवून पराभूत झाले. इतर मागासवर्गीय गटातून विजयसिंह माने 4631 मते घेवून विजयी झाले. तर रविंद्र मंडके 2750 मते घेवून पराभूत झाले.जिल्हा बॅंकेची मतमोजणी अत्यंत शिस्तबध्द व शांततेत झाली. अधिकाऱ्यांनी केलेल्या योग्य नियोजनामुळे मतमोजणी वेळेत पूर्ण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.