सकाळी ७ ते दुपारी ३ पर्यंत 44.93 टक्के मतदान झाले आहे. काही ठिकाणी मतदान केंद्रांवर उन्हाचा तडाखा जाणवू लागला आहे.
कोल्हापूरची जनता भाजपला आशीर्वाद देईल - चंद्रकांत पाटील
आज सकाळपासून 'कोल्हापूर उत्तर' विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान सुर झाले आहे. दरम्यान, या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लागेलेले दोन दिग्गज नेत्यांचे एकमेकांविरोधातील टोलेबाजी सुरु आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सध्या एक ट्विट केलं आहे. यात ते म्हणतात, आज अतिशय उत्साहाने मतदान सुरू आहे. आज सकाळपासून मतदासाठीचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून कोल्हापूरची जनता नक्कीच भाजपाला आपला आशीर्वाद देतील, यात शंका नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
चंद्रकांतदादा, मालोजीराजेंची गळाभेट; कार्यकर्त्यांत घोषणाबाजी
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मालोजीराजे छत्रपती हे दोन्ही नेते आठ नंबर शाळेतील मतदान केंद्रासमोर एकत्रित आले. यावेळी दोघांनी गळा भेट घेतली मात्र यावेळी दोन्ही बाजूने झालेल्या घोषणाबाजीने तणावाचे वातावरण निर्माण केले यानंतर चंद्रकांत पाटील निघून गेले आहेत. पोलिस या ठिकाणी आल्याने वातावरण अधिक तणावपूर्ण बनले. मालोजीराजेंना धक्का लागू नये म्हणून कार्यकर्ते पुढे आले. यामुळे तणावात काहीशी भर पडली. अखेर मालोजीराजे छत्रपती यांनी कार्यकर्त्यांना आणि पोलिसांना शांत केले. दरम्यान, मालोजीराजे आणि पोलिस अधिकाऱ्यांचा ताफाही तेथून निघून गेला. पंधरा मिनिटांनंतर वातावरण पूर्णपणे निवळले. याचा मतदानावर कोणताही परिणाम झाला नाही.
उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू झाल्यानंतर मतदान केंद्राजवळील बुथवर भगवे छत लावण्यावरून शिवाजी पेठेतील निवृत्ती चौकात कार्यकर्त्यांनी वाद घातला. केवळ टेबल टाकून थांबण्याच्या सूचना पोलिसांनी केल्या. यामुळे काय काय वातावरण तणावपूर्ण बनले. निवृत्ती चौका नजीक असलेल्या दौलतराव भोसले विद्यालयातील केंद्रासाठी भाजपचे कार्यकर्त बुथ लावून थांबले होते. प्रथम पोलिसांनी बूथ शंभर मीटरच्या अंतरा बाहेर लावायला सांगितले. तसेच बूथवरील भगवे छत काढण्यास सांगितले. 100 मीटर अंतराच्या पट्ट्या बाहेरच टेबल असल्याचे सांगून भाजपच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांसोबत वाद घातला. तेथील महाविकास आघाडीचे टेबल ही हटवण्यास पोलिसांनी सांगितले आहे.
शहरात मतदानाची लगबग पहायला मिळत असून सकाळी ७ ते ११ या वेळेत एकून २०.५७ टक्के मतदान झाले आहे.
शहरातील ताराराणी विद्यापीठ येथील मतदान केंद्रांत पाठीमागचे गेट सुरू ठेवण्यावरून कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली आहे. यावेळी माजी नगरसेवक अनिल कदम उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेऊन रस्त्यावरच ठिय्या मांडला आहे.
विधानसभेच्या कोल्हापूर विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणूकीत सकाळी 9 नंतर चुरस वाढत आहेत. यातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील व कॉंग्रेसचे आमदार ऋतुराज पाटील यांनी कसबा बावडा येथील मतदान केंद्रावर गळाभेट घेतली. तसेच, ऋतुराज पाटील यांच्याकडूनच पालकमंत्री सतेज पाटील यांना शुभेच्छा देत मी घरीच येणार होतो, पण तुम्ही बाहेर पडला असाल म्हणून आलो नसल्याचेही चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले आहे.
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मतदानाचा हक्क बजावला. या निर्भीड लोकशाहीला बळकट करण्यासाठी माझे सर्व बंधू-भगिनीना विशेषत: माझ्या तरुण मित्रांना आवाहन आहे की विक्रमी संख्येने मतदान करूया, लोकशाहीला समृद्ध बनवूया, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी ट्विटद्वारे केलं आहे.
विधानसभेच्या कोल्हापूर उत्तर मतदार संघातील पोटनिवडणूकीसाठी आज सकाळी 7 पासून मतदानाला सुरुवात झाली. दरम्यान, निवृत्ती चौकात भगवे छत लावण्यावरून पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली. यावर पोलिसांनी भगवे छत न लावता केवळ बुथ लावाला जावा असे आवाहन केले आहे.
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत प्रायव्हेट हायस्कूल येथील मतदान केंद्रावर नव मतदार राष्ट्रीय जलतरण पटू आभा देशपांडे हिने पहिल्यांदाच मतदानाचा अधिकार बजावला.
शहरातील मुक्त सैनिक वसाहत परिसरात सकाळी फिरायला जाताना काही मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यामुळे काही बुथवर सकाळी गर्दी दिसून आली. रुइकर कॉलनी परिसरातही अपेक्षेप्रमाणे सकाळच्या सत्रात निरुत्साह मोजकेच लोक मतदानाला आले. थोड्याफार फरकाने महाडिक वसाहत येथील मतदान केंद्रावरही असेच चित्र पहायला मिळाले. कदमवाडी रोड मतदार केंद्रावर काहीसे गर्दीचे चित्र पहायला मिळाले आहे. याशिवाय कपूर वसाहत येथील मतदान केंद्रावर मतदारांची संख्या जेमतेम असून मतदारांना मतदान केंद्रांवर पोहचवण्यासाठी आणि परत नेण्यासाठी जवळपास वीसवर रिक्षा थांबून आहेत. जाधवाडी मतदान केंद्रावर काहीसा उत्साह पहायला मिळाला आहे.
'कोल्हापूर उत्तर' विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणुकीला सुरुवात, शहरातील मतदान केंद्रांवर मतदारांची तुरळक गर्दी
कोल्हापूर शहरातील शिवाजी पेठ येथील 8 नंबर शाळेत मतदारांनी मतदानासाठी उपस्थिती दर्शवली आहे.
तोरस्कर चौकात भाजपतर्फे बुथवर भगव्या आणि हिरव्या रंगाचे उभारलेले तंबू काढण्यास कार्यकर्त्यांना भाग पाडले आहे.
शहरातील शिवाजी पेठेत परिसरात शांततेत मतदान सुरू आहे.
कसबा बावडा परिसरात मतदानासाठी प्रचंड उत्साह असल्याने मतदारांनी वाजत-गाजत मिरवणुक काढून मतदानाचा हक्का बजावला आहे. यावेळी कॉंग्रेस उमेदवार जयश्री जाधव यांचा विजय पक्का असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.