कोल्हापुरातील राधानगरी धरण परिसरात सध्या जोरदार पाऊस सुरु आहे. धरणही शंभर टक्के भरलं आहे, त्यामुळं धरणांमधून पाण्याचा विसर्गही सुरु करण्यात आला आहे. बुधवारी दुपारी ३.३० वाजेपर्यंत धरणाचे स्वयंचलित पाच दरवाजे उघडण्यात आले, अशी माहिती राधानगरी धरणाचे उपअभियंता प्रवीण पारकर यांनी दिली.
हवामान खात्यानं उद्या मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा दिल्यानं प्रशासनाकडून सर्व सरकारी आणि खासगी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाची प्रणाली विकसित व वायव्य दिशेला तिची हालचाल होण्याची शक्यता असल्याने पुढील ५ दिवसांत महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
सांयकाळी. 6:00 वा.
राजाराम बंधारा पाणी पातळी 40ʼ04'' (542.48m)
विसर्ग : 60022cusecs
(पंचगंगा नदी इशारा पातळी 39'00" व धोका पातळी - 43'00")
एकुण पाण्याखालील बंधारे -: 81
राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस आहे. आज हवामान विभागाने कोल्हापूर जिल्ह्याला रेड अलर्ट, तर उद्या ऑरेंज अलर्ट दिला आहे. सध्या पंचगंगा नदीवरील राजाराम बांधाऱ्यांची पाणीपातळी 40 फूट 5 इंच आहे. तर इशारा पातळी 39 फुट व धोका पातळी 43 फुट आहे. जिल्ह्यातील 81 बंधारे पाण्याखाली आहेत.पंचगंगेने इशारा पातळी ओलांडली आहे. नदीकाठावरील गावांचे स्थलांतर केले जात आहे.दरम्यान सातारा जिल्ह्याला आज आणि उद्या रेड अलर्ट देण्यात आला आहे
महाराष्ट्रात मान्सून सक्रिय आहे. पुढील ३ तास मुंबईमध्ये मुसळधार सरींसह पावसाची संततधार आणखी सुरू राहण्याची शक्यता आहे.
कमी वेळात जास्त पावसामुळे मुंबई, ठाणे, रायगडमध्ये काही ठिकाणी झाडे, भिंती पडणे, डोंगरावरून दगड, माती वाहून येणे, पाणी साचण्याची शक्यता आहे.
IMD ने उद्या रत्नागिरी जिल्ह्यात 'रेड' अलर्ट जारी केला. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट
पुढील 3-4 तासांत सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे, कोल्हापूर जिल्ह्यातील घाट परिसरात काही ठिकाणी मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागात वादळी वाऱ्यासह मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. घराबाहेर पडताना खबरदारी घ्या.
40ʼ05'' (542.51m)
विसर्ग : 60106 cusecs
(पंचगंगा नदी इशारा पातळी 39'00" व धोका पातळी - 43'00")
एकूण पाण्याखालील बंधारे -: 8
आज सकाळपासून राधानगरी धरणाचे 5 दरवाजे उघडले गेले आहेत.
दुपारी 1.23 वाजता
स्वयंचलित द्वार क्रं 7 उघडले आहे.
एकूण 5 द्वारे उघडी ( 3,4,5,6 & 7)
विसर्ग : पाच दरवाज्यातून 7140 क्यूसेस
पाॅवर हाऊसमधून 1400 क्यूसेस
एकूण विसर्ग : 8540 क्यूसेस सुरू आहे.
आज 26 जुलै 2023 दुपारी 1 वाजेपर्यंत राधानगरी धरणाचे 4 च दरवाजे सुरु आहेत. मात्र, सर्व दरवाजे सुरु झाल्याची अफवा पसरवली जात आहे. परंतु, सध्या धरणाचे 4 च दरवाजे सुरु आहेत.
धरण परिसरात अतिवृष्टी सुरूच असल्याने चांदोली धरण ८१.२७ टक्के भरले आहे. आज बुधवारी सकाळी ११. ४५ मिनिटांनी धरण दरवाजामधून १५०० व विद्युत निर्मितीमधून ९११ असा एकूण २४११ क्युसेक विसर्ग सुरु करण्यात आला आहे. यामुळे वारणा नदीच्या पाणीपातळी झपाट्याने वाढ होत आहे. प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.
पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. राधानगरी,कुंभी,तुळशी,कासारी धरणातून पाणी पंचगंगा नदीत येत असते. दरम्यान, राधानगरी धरणाचे 4 स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. मात्र हे पाणी कोल्हापूर शहरापर्यंत यायला 15 तास लागतात. त्यामुळे पाऊस पडला नाही तर नदीची पाणी पातळी जास्तीत जास्त 44 फुटांपर्यंत जाऊ शकते. कोल्हापूर शहरामध्ये पाणी येते त्या ठिकणावरील नागरिकांना स्थलांतरित करण्यात येत आहे. चिखली, आंबेवाडी, आरे गावातील नागरिकांसाठी सर्व व्यवस्था केली आहे. नागरिकांच्या राहण्याची, जेवणाची, आरोग्याची व्यवस्था केलीये. जनावरांचा चारा, त्यांना बांधण्याची व्यवस्था केलीये. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, सूचनांचे पालन करावे. घराच्या दारापर्यंत पाणी येण्याची वाट पाहू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले. आज ते माध्यमांशी संवाद साधत होते.
सातारा जिल्ह्यात सरासरी 23.3 मि.मी. पावसाची नोंद झाली असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 350.7 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस एकूण सरासरीच्या 39.06 टक्के इतका आहे.
धरणक्षेत्रात चांगला पाऊस होत असल्याने पुणेकरांसाठी खूश खबर आहे. पुण्यातील खडकवासला धरण 91 टक्के भरलं असून या धरणातून पाणी सोडायला सुरुवात झाली आहे. सध्या धरणातून 2 हजार 568 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. तर खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा २५६८ क्युसेक विसर्ग कमी करुन सकाळी ११ वा. १७१२ क्यूसेस करण्यात येत आहे.
जोतिबा डोंगर : श्री क्षेत्र जोतिबा डोंगरचा (Jyotiba Temple Kolhapur) मुख्य रस्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाण्याचा टाका भागातील रस्ता पावसामुळे खचण्यास सुरुवात झाली आहे. खबरदारी म्हणून गत पावसाळ्यापासूनच रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे.
आज सकाळी 10.06 वाजता
स्वयंचलित द्वार क्रं 4 उघडले आहे.
एकूण 4 द्वारे उघडले ( 3,4,5 & 6 )
विसर्ग : चार दरवाज्यातून 5712 cusec
पाॅवर हाऊसमधून 1400 cusec
एकूण विसर्ग : 7112 cusecs सुरू आहे.
खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा 3424 क्युसेक विसर्ग कमी करुन सकाळी ७ वा. २५६८ क्यूसेस करण्यात येत आहे.
मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांपैकी तानसा तलाव आज (२६ जुलै २०२३) पहाटे ४ वाजून ३५ मिनिटांनी भरुन ओसंडून वाहू लागला आहे.
मंगळवारी रद्द करण्यात आलेली ही बैठक थोड्याच वेळात पार पडणार आहे. मंत्रालयात दालन क्रमांक 503, उपमुख्यमंत्री कार्यालय इथं बैठकीचं आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीसाठी आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील पोहचले आहेत.
पावसाचा जोर कमी झाला असला, तरी पानशेत-मुठा खोर्यात संततधार सुरू आहे. खडकवासला धरणातील साठा 92 टक्क्यांवर गेला आहे. त्यामुळे मंगळवारी (दि. 25) रात्री 11 वाजता खडकवासलातून 3424 क्युसेक वेगाने मुठा नदीत विसर्ग सुरू करण्यात आला आहे. दिवसअखेर खडकवासला धरण साखळीत 18.59 टीएमसी म्हणजे 63.77 टक्के साठा झाला होता. सोमवारी (दि. 24) सायंकाळी खडकवासलातून मुठा कालव्यात पाणी सोडण्यास सुरुवात झाली. कालव्यात सध्या 1 हजार 5 क्युसेक पाणी सोडले जात आहे.
रत्नागिरी : मॉन्सूनचे (Monsoon) उशिराने आगमन झाले तरीही जुलै महिन्यात पूर परिस्थिती उद्भवली आहे. दीड महिन्यात घरे, गोठे, सार्वजनिक मालमत्तांचे १ कोटी ३५ लाखांचे नुकसान झाले. रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीतील दुर्घटनेनंतर सतर्कता म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातील १५० दरडप्रवण गावांतील ५७१ कुटुंबांमधील १७०१ लोकांचे स्थलांतर करण्यात आले.
कोल्हापुरातील राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा उघडण्यात आला आहे. आज 8.15 मिनिटांनी हा दरवाजा उघडला गेला. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
राधानगरी धरण
दिनांक 26 जुलै 2023
सकाळी 9:10 वाजता
स्वयंचलित द्वार क्रं 5 उघडले आहे.
एकूण 2 ( 5 & 6 )
विसर्ग : दोन दरवाजातून 2856 क्युसेस
पाॅवर हाऊसमधून 1400 क्युसेस
एकूण विसर्ग : 4256 क्युसेस सुरू आहे.
राज्यात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. कोकण पट्ट्यात गेल्या आठवड्याभरापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. रायगडमध्ये हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर तातडीने आज बुधवारी सतर्कच्या पार्श्वभूमीवर शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर रायगडपाठोपाठ आता रत्नागिरी आणि खेडमध्ये रात्रीपासून पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे तिथेही रेड अलर्ट जारी केला आहे.
तुळशी ३.४७ १.७४ नाही
वारणा ३४.३९ २७.२३ ८९७
दूधगंगा २५.३९ १३.४९ नाही
कासारी २.७७ २.२१ १०००
कडवी २.५१ २.२२ १५०
कुंभी २.७१ २.२१ ७००
पाटगाव ३.७१ २.५७ नाही
चिकोत्रा १.५२ ०.८१ नाही
चित्री १.८८ १.२८ नाही
जंगमहट्टी १.२२ ०.८७ नाही
घटप्रभा १.५६ १.५६ ४४५३
जांबरे ०.८१ ०.८२ १४८७
आंबेओहोळ १.२४ ०.९८ नाही
कोल्हापूरात खासबाग या ऐतिहासिक शाहूकालीन कुस्ती आखाड्याची भिंत कोसळल्याची घटना घडली. स्वच्छतागृहावर भितीचा काही भाग ढासळला. यामध्ये दोन महिला अडकल्या होत्या, यापैकी एका महिलेला सुखरुप बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले आहे.
पाटण : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. नवजा परिसरात आज अडीचशे मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, नवजा व महाबळेश्वरच्या पावसाने आज तीन हजार मिलिमीटर पावसाचा टप्पा पार केला आहे. कोयना धरणाचा एकूण पाणीसाठा ५८.८१ टीएमसी झाला असून, गेल्या २४ तासांत ५ टीएमसीने पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.
कुडाळ : कुडाळी मध्यम प्रकल्प- महू धरण पाणलोट क्षेत्रामधील संततधार पावसामुळे महू धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या सांडव्यावरून विसर्ग सुरू होऊ शकतो. कुडाळी नदीकाठावरील सर्व लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीपात्रामध्ये प्रवेश करू नये, तसेच पुलावरून पाणी वाहत असताना पूल ओलांडू नये, असा सूचना आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने केल्या आहेत.
कोल्हापूर : पावसाचे प्रमाण तुलनेत कमी आल्याने पंचगंगेची पातळी आज रात्री नऊपर्यंत सुमारे अकरा तास स्थिर होती. ती रात्री नऊ वाजता ४०.५ तर रात्री बारा वाजता ४०.६ फूट होती. दुसरीकडे राधानगरी धरणात ८.१९ टीएमसी साठा झाला असून, धरण ९८ टक्के भरले आहे.
Monsoon Latest Live Update : राज्यात जोरदार पावसानं धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. मुंबई उपनगरासह ठाणे, पालघर या भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. तसेच कोकण विभाग, मध्य महाराष्ट्रासह विदर्भात पावसाचा जोर वाढला आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आजही राज्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. यामध्ये कोकणासह पश्चिम-मध्य महाराष्ट्र, विदर्भात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर सिंधुदुर्ग, कोल्हापूर, ठाणे, पालघर आणि मुंबईला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पश्चिम महाष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यासाठी आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.