Kolhapur By Election Result: जयश्री जाधवांचा डंका, कोल्हापुरात भाजपचा करेक्ट कार्यक्रम!

Kolhapur By Election Result: जयश्री जाधवांचा डंका, कोल्हापुरात भाजपचा करेक्ट कार्यक्रम!

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी (Kolhapur North Vidhansabha Bypoll Elections 2022) चुरशीची लढत होतं आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभेची पोटनिवडणूक ही 2024 च्या निवडणुकांची (Maharashtra State Assembly Elections 2022) लिटमस चाचणी असेल, असं म्हटलं जातं आहे. त्यामुळं यात कॉंग्रेसचे पालकमंत्री सतेज पाटील आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील या दोन दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप (Mahavikas Aghadi vs BJP) असा थेट सामना असल्यासारखी आहे. भाजपच्या देवेंद्र फडणवीसांपासून ते काँग्रेसच्या सतेज पाटील यांच्यापर्यंत सगळ्यांनी या पोटनिवडणुकीत कोल्हापूर उत्तरचा मतदारसंघ पिंजून काढला आहे. कॉंग्रेसकडून जयश्री जाधव आणि भाजपकडून सत्यजित कदम हे दोन उमेदवार या निवडणुक रिंगणात होते. त्यामुळे आज कोण बाजी मारणार हा फैसला होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेवटच्या फेरीत कॉंग्रेसच्या जयश्री जाधव यांना 145 आणि भाजपच्या सत्यजित कदम 1303 यांना मत मिळाली आहेत. 18, 901 मतांनी त्यांनी सत्यजित कदम यांचा पराभव केला आहे. मतमोजणीच्या फेऱ्या पूर्ण झाल्या असून जयश्री जाधव यांनी बाजी मारली आहे.

राजारामपुरी पूर्व, तोरणा नगर या परिसरात जयश्री जाधव यांना 2755, तर सत्यजित कदम यांना 2949 मते मिळाली आहेत. एकूण 18, 644 आघाडीवर आहे.

मंगळवार पेठ, यादव नगर, राजारामपुरी, शाहू मिल, मातंग वसाहत, यादवनगर येथे जयश्री जाधव यांना 5337 मते आणि सत्यजित कदम यांना 2830 मते मिळाली आहेत. एकूण 18, 838 मतांनी त्या आघाडीवर आहेत.

22 व्या फेरीअखेर जयश्री जाधव यांना 3337 मते तर सत्यजित कदम यांना 2531 मते मिळाली आहेत. जाधव यांनी या फेरीत 15525 मतांची आघाडी घेत विजयाकडे वाटचाल केली आहे.

21 फेरीत एकूण 7256 झाले आहे. यातील जयश्री जाधव यांना 3452 मते तर सत्यजित कदम यांना 3662 मते मिळाली आहेत. शहरातील वरुणतीर्थ वेस ११ आणि भवानी मंडप ३ येथील मतमोजणीनंतर ही आकडेवारी हाती आली आहे.

कोल्हापुरात ठिकठिकाणी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषाला सुरुवात केली आहे. सम्राट नगर येथील जयश्री जाधव यांच्या घरासमोर फटाक्यांची आतषबाजी गुलालाची उधळण करीत कार्यकर्ते जल्लोष साजरा करत आहेत.

मतमोजणीच्या 19 व्या फेरीअखेरीस कॉंग्रेस उमेदवार जयश्री जाधव या 14140 मतांनी आघाडीवर आहेत.

8 फेरी अखेर कॉंग्रसेच्या जयश्री जाधव13 हजार 800 मतांनी आघाडीवर आहेत. संध्यामठ, फिरंगाई परिसरात जयश्री जाधव यांना 3948 मते तर सत्यजित कदम यांना 3189 मते मिळाली आहेत.

कोल्हापूर - कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत टपाली मतांत काँग्रेसच्या उमेदवार श्रीमती जयश्री जाधव यांनी बाजी मारली. एकूण ६०४ टपाली मतांपैकी काँग्रेसच्या श्रीमती जयश्री जाधव यांना ३१५ एवढी तर भाजपचे सत्यजित कदम यांना २१४ मते मिळाली. दिव्यांग व ज्येष्ठ नागरीकांसाठी टपाली मतांची सोय करण्यात आली होती. यासाठी ६८८ मतदारांनी नोंदणी केली होती. या मतदारांच्या घरात जाऊन निवडणूक कर्मचाऱ्यांनी ही मते नोंदवली होती. ६८८ पैकी ६०३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. दहा पेट्यांतून ही मते स्ट्राँग रूममध्ये आणण्यात आली होती. मतमोजणीची सुरूवात या टपाली मताने झाली. त्यात काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी श्री. कदम यांच्यापेक्षा १०५ मते जास्त घेतली.

अकबर मोहल्ला, शिवाजी चौक, शाहू टॉकीज, महापालिका परिसरात जयश्री जाधव यांना 4386 मते आणि सत्यजित कदम यांना 2432 मते मिळाली आहे. यामध्ये एकूण 11179 मतांचे लीड आहे.

12 व्या फेरीत जयश्री जाधव 1038 मतांनी आघाडीवर आहेत. जयश्री जाधव यांना 3946 नाना कदम यांना 2908 मते, जयश्री जाधव 9225 एकूण आघाडीवर

कोल्हापूर - कोल्हापूर उत्तर विधानसभा पोट निवडणुकीत ८ व्या, ९ व्या आणि १० व्या फेरीत भाजपचे सत्यजीत कदम यांनी १६४३ मतांची आघाडी घेतली असली तरी ११ व्या फेरीत मात्र काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी ११४ मतांची आघाडी घेत आपली विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. ११ व्या फेरी अखेर ७८ हजार ४५४ मते मोजण्यात आली. त्यात जाधव यांना ४२ हजार ४७५ तर कदम यांना ३४३२८ मते मिळाली. जाधव यांच्या एकूण मतांची आघाडी ८ हजार १८७ जाली आहे. अद्याप ९३ हजार १०८ मते माजायची आहेत.

सम्राटनगर येथील जयश्री जाधव यांच्या घरी कार्यकर्त्यांची गर्दी वाढू लागली आहे.

दहव्या फेरी अखेर जाधव यांना ३९, ६०५ मते तर कदम यांना ३१,५१२ मते मिळाली आहेत. ८०७३ मतांचे लीड आहे. 8 हजार मातांनी जयश्री जाधव आघाडीवर आहेत.

पालकमंत्री सतेज पाटील आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या दृष्टीने प्रतिष्ठेच्या ठरलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत ९ व्या फेरी अखेर काँग्रेस उमेदवार ८ हजार ९५९ मतांनी आघाडीवर आहेत. ९ व्या फेरीमध्ये सत्यजीत कदम यांनी १९३ मतांची आघाडी घेतली. या फेरी अखेर एकूण ६५ हजार ९४२ मते मोजली असून या पैकी ३६ हजार ७३७ मते जाधव यांना तर २७ हजार ७७८ मते कदम यांना मिळालेली आहेत. अजूनही ९ व्या फेरीअखेर १ लाख १२ हजार ६०० मतांची मोजणी व्हायची

भाजप उमेदवार सत्यजित कदम हे सुरुवातीपासूनच पिछाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. विचारेमाळ सदर बझार, ताराराणी चौक, रुईकर कॉलनी येथील मते -

जयश्री जाधव 3632

सत्यजित कदम 2431

फेरीतील लीड 1201

एकूण लीड 9676

कोल्हापुरतील कदमवाडी, जाधववाडी, भोसलेवाडी या भागात भाजपाचे सत्यजित कदम हे 653 मतांनी आघाडीवर आहेत.

पाचव्या फेरीत कदमवाडी पूर्ण जाधववाडी या परिसरात कॉंग्रेसच्या जयश्री जाधव यांना 3673 तर सत्यजित कदम यांना 4198 मते मिळाली आहेत.

तिसऱ्या फेरीअखरेही कॉंग्रेस उमेदवार आघाडीवर जयश्री जाधव यांना 492 तर सत्यजित कदम यांना 2566 मते

कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीत दुसऱ्याफेरी अखेर कॉंग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव दुप्पट म्हणजचे 5139 मतांनी आघाडीवर आहेत. पहिल्या फेरीत जाधव यांना 4856 तर कदम यांना 2719 मते मिळाली आहे. दुसऱ्या फेरीत जयश्री जाधव 5515 तर सत्यजित कदम 2513 मते मिळाली आहे. दरम्यान, कॉंग्रेसच्या जाधव या दुसऱ्या फेरी अखेर 5139 मतांनी आघाडीवर आहेत.

कोल्हापूर - राज्याच्या राजकीय पटलाचे लक्ष लागून राहीलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत पहिल्या फेरीत काँग्रेसच्या श्रीमती जयश्री जाधव यांनी २१३७ मतांची आघाडी घेतली आहे. पहिल्या फेरीत ७ हजार ७७८१ मते मोजण्यात आली, त्यात श्रीमती जाधव यांना ४८५६ तर भाजपचे सत्यजित कदम यांना २७१९ मते मिळाली. सद्या कसबा बावडा या पालकमंत्री सतेज पाटील यांचा प्रभाव असलेल्या भागाची मतमोजणी सुरू आहे. अजून दोन फेऱ्यात याच भागातील मतमोजणी असेल.

विधानसभेच्या कोल्हापूर उत्तर मतदार संघातील पोटनिवडणुकीत टपाली मतदानात 688 पैकी 603 मते घरोघरी जाऊन घेतलेली आहेत. आणि 1 मत पोस्टाने आले आहे. अशी एकूण 604 मतदान टपाली आली आहेत.

आज सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली असून टपाल मतमोजणी सुरु आहे.

Related Stories

No stories found.