Deepak Kesarkar : आदित्य ठाकरे खूपच लहान, त्यांच्याविरोधात बोललो तर ठाकरेंना परवडणार नाही; केसरकरांचा स्पष्ट इशारा

माझ्या मतदार संघात येऊन माझ्यावर बोलणारे आदित्य ठाकरे माझ्यापेक्षा खूप लहान आहेत.
Deepak Kesarkar vs Aditya Thackeray
Deepak Kesarkar vs Aditya Thackerayesakal
Updated on
Summary

'माझ्याच मतदार संघात येऊन आदित्य ठाकरे माझ्या विरोधात बोलत असतील तर ते मी सहन करणार नाही.'

सावंतवाडी : माझ्या मतदार संघात येऊन माझ्यावर बोलणारे आदित्य ठाकरे माझ्यापेक्षा खूप लहान आहेत. त्यामुळे त्यांनी विरोधात बोलताना मर्यादा पाळाव्यात. मी त्यांच्या मतदार संघात जाऊन बोललो तर त्यांना परवडणार नाही, असा इशारा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी श्री. ठाकरे यांना दिला.

दरम्यान, महिला विधेयक मंजूर झाले असले तरी कोणाचे नुकसान होणार नाही. सभागृहातील काही जागा वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे महिलांची संख्या वाढली तरी ज्या चांगल्या व्यक्ती आहेत त्यांना निश्चितच स्थान मिळणार आहे, असे त्यांनी सांगितले.

Deepak Kesarkar vs Aditya Thackeray
Sharad Ponkshe : 'बाजीराव पेशवे हा छत्रपती शिवरायांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारा धुरंधर वीरपुरुष होता'

शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी सावंतवाडी दौऱ्यात केसरकर यांच्यावर टीका केली होती. त्यांच्याबद्दल काय बोलणार? ते खोके सरकारमधील आहेत, असा आरोप केला होता. याबाबत श्री. केसरकर यांनी काल उशिरा प्रतिक्रिया दिली.

Deepak Kesarkar vs Aditya Thackeray
Rohit Pawar : श्रीकांत शिंदेंसह गटाच्या सर्वच खासदारांना कमळावर निवडणूक लढवावी लागेल; रोहित पवारांनी दिला धोक्याचा इशारा

पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, “या ठिकाणी माझ्याच मतदार संघात येऊन आदित्य ठाकरे माझ्या विरोधात बोलत असतील तर ते मी सहन करणार नाही. ते माझ्या पेक्षा लहान आहेत. त्यामुळे त्यांनी माझ्याविरोधात बोलताना मर्यादा सांभाळल्या पाहिजेत. आजपर्यंत मी ठाकरे कुटुंबियांच्या विरोधात बोललो नाही आणि त्यांनी तशीच टीका सुरू ठेवली तर मी त्यांच्या मतदार संघात जाऊन त्यांच्याविरोधात अनेक काही गोष्टी बोलू शकतो; मात्र त्यावेळी ते ठाकरेंना परवडणार नाही.”

Deepak Kesarkar vs Aditya Thackeray
Miraj Ganeshotsav : ठाकरे सेनेच्या कमानीवर गुवाहाटीचे चित्र; शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा आक्षेप, वाद चिघळण्याची शक्यता

यावेळी महिला विधेयकाच्या बाबत त्यांना विचारले असता केसरकर म्हणाले, “या विधेयकामुळे नारीशक्तीचा खऱ्याअर्थाने विजय झाला आहे. विधेयक मंजूर झाल्याने याचा फायदा आता महिलांना होणार आहे; मात्र सद्यस्थिती लक्षात घेता विरोधकांनी एकीकडे श्रेय घेण्यास सुरवात केली आहे, तर दुसरीकडे जागा कमी होणार आहे, अशी ओरड सुरू केली आहे; मात्र या निर्णयामुळे जागा वाढणार आहे. त्यामुळे ज्यांनी सभागृहात चांगले काम केले, त्यांना निश्चितच पुन्हा सभागृहात येण्याची संधी मिळणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()