Konkan Rain : अरबी समुद्रात चक्रीवादळ खवळलं! केरळ, गोव्यासह राज्याच्या किनारी भागात जोरदार पाऊस; ऑरेंज अलर्ट जारी

कोकण किनारपट्टीवर समुद्र खवळलेला नसला तरीही खोल समुद्रात धोका निर्माण होऊ शकतो.
Konkan Rain Arabian Sea Cyclone Orange Alert Ratnagiri
Konkan Rain Arabian Sea Cyclone Orange Alert Ratnagiriesakal
Updated on
Summary

केरळसह गोवा राज्याच्या किनारी भागात वादळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

रत्नागिरी : अरबी समुद्रात चक्रीवादळ (Cyclone) निर्माण झाल्यामुळे कोकण किनारपट्टीसह पाऊस (Konkan Rain) पडत आहे. हवामान विभागाच्या इशाऱ्यामुळे शनिवारी (ता. ३०) जिल्ह्यातील नौका बंदरातच उभ्या होत्या. पावसासह वादळाचा प्रभाव दोन दिवस राहील, अशी शक्यता वर्तवण्यात (Meteorology Department) आली आहे.

त्यामुळे दोन दिवस मासेमारीला ब्रेक लागणार आहे. शनिवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी १२.४४ मिमी पाऊस झाला आहे. त्यात मंडणगड ५, दापोली ४२, खेड १६, गुहागर २३, चिपळूण १५, संगमेश्‍वर ६, रत्नागिरी २, लांजा १, राजापूर २ मिमी नोंद झाली आहे. १ जूनपासून आतापर्यंत ३०६४ मि.मी. पाऊस झाला आहे.

Konkan Rain Arabian Sea Cyclone Orange Alert Ratnagiri
Ratnagiri Politics : राणेंची 'ती' ऑफर धुडकावत सामंतांनी बदलला Whatsapp DP; मशालीच्या 'डीपी'ने राजकीय तर्कांना उधाण

मागील आठवडाभर जिल्ह्यात थांबून थांबून सरी पडत आहेत. शुक्रवारी रात्री वेगवान वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. सुमारे अर्ध्या तासाहून अधिक काळ जोर होता. शनिवारी सकाळी ढगाळ वातावरण होते. दिवसभरात एखादी सर पडून गेली; मात्र सायंकाळी वाऱ्‍यासह पावसाला सुरुवात झाली. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे पावसाला सुरुवात झाली असून, याचा जोर दोन दिवस राहणार आहे.

Konkan Rain Arabian Sea Cyclone Orange Alert Ratnagiri
Konkan Rain : कोकण किनारपट्टी भागात पुढील तीन-चार दिवस पावसाचा जोर वाढणार; हवामान विभागानं वर्तवला अंदाज

केरळसह गोवा राज्याच्या किनारी भागात वादळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. कोकण किनारपट्टीवर समुद्र खवळलेला नसला तरीही खोल समुद्रात धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे रत्नागिरीतील सर्वात मोठे बंदर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिरकरवाडा येथील नौका बंदरातच उभ्या करून ठेवण्यात आल्या आहेत. एकही नौका आज बाहेर पडली नसल्याचे मच्छीमारांनी सांगितले. वादळाचा प्रभाव उद्या दुपारपर्यंत राहणार आहे. हवामान विभागाने कोकण किनारपट्टीवर ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे रविवारी दिवसभर मासेमारी बंद राहण्याची शक्यता आहे.

दरम्यान, वातावरण बिघडलेले असले तरीही काही मच्छीमारी नौका किनारी भागात मासेमारीला बाहेर पडल्या होत्या. त्यांना काही प्रमाणात लेप मासा सापडला आहे. मागील आठवड्यात बहुसंख्य मच्छीमारांना उष्टी बांगडी मिळत होती. फिशमिलमध्ये ३२ किलोला ८०० रुपये दराने खरेदी सुरू आहे. किलोचा दर २५ रुपये आहे. पंधरा दिवसांपूर्वी किलोचा दर १२ ते १५ रुपयांवर आला होता.

Konkan Rain Arabian Sea Cyclone Orange Alert Ratnagiri
Belgaum News : ऐन पावसाळ्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बेळगावात पाडला कृत्रिम पाऊस; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

अतिपावसामुळे भातपिकाला धोका

सप्टेंबरअखेरीस पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. सलग पडत असलेल्या पावसामुळे भातपिकांना धोका होऊ शकतो. पावसाचे पाणी प्रमाणापेक्षा अधिक भातशेतात साचून राहिले तर रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. पावसामुळे दाणे भरलेली रोपं खाली पडून जाऊ शकतात, अशी भीती शेतकऱ्‍यांकडून व्यक्त होत आहे.

हवामान विभागाने चक्रीवादळाचा इशारा दिल्यामुळे मिरकरवाडा बंदरातील नौका मासेमारीसाठी समुद्रात गेलेल्या नाहीत. सलग दोन दिवस नौका बंदरातच उभ्या आहेत. मागील आठवड्यात काही प्रमाणात मासळी मिळत होती.

- पुष्कर भुते, मच्छीमार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.