अमित गवळे, पाली: गणेशोत्सवानिमित्त रायगड आणि तळकोकणात गेलेले चाकरमानी पाच दिवसांच्या गणरायाला निरोप देऊन शुक्रवारी (ता.13) पासून पुन्हा प्रतीच्या मार्गाला लागले आहेत. मात्र येथील मुंबई गोवा मार्गावरील वाहतूक कोंडी आणि अनेक ठिकाणी असलेल्या खराब रस्त्यामुळे गणेशभक्त आणि चाकरमानी यांना पुरता मनस्ताप झाला.