'यल्गार परिषदेमुळं भीमा कोरेगाव दंगल घडलेली नाही.'
सोलापूर : यल्गार परिषदेमुळं भीमा कोरेगाव दंगल (Koregaon Bhima Violence Case) घडलेली नाही. या दंगल प्रकरणात संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी आम्ही यापूर्वीही केली होती. आजही मागणी कायम आहे, असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athavale) यांनी गुरुवारी इथं पत्रकार परिषदेत सांगितलं.
कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणातील दोषारोपपत्रातून (Charge Sheet) सबळ पुरावे न मिळाल्याने शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे (Founder of Shiv Pratishthan Sambhaji Bhide) यांचं नाव वगळल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांनी (Pune Rural Police) राज्य मानवी हक्क आयोगाला (State Human Rights Commission) दिलीय. तसा अहवालही सादर करण्यात आलाय. त्यानंतर आता सोलापूर दौऱ्यावर असणारे रिपाइंचे नेते (RPI) केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आठवले यांनी यावर भाष्य केलंय.
ते म्हणाले, कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात (Koregaon Bhima Violence Case) जरी संभाजी भिडे यांचं नाव वगळण्यात आलं, तरी त्यांची सखोल चौकशी केली पाहिजे. त्यांच्या विरोधातील पुरावे शोधले पाहिजे. त्यांच्यावर कारवाई होण्याबाबत आपण आग्रही असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. भिडे गुरुजींवर (Bhide Guruji) कारवाई झाली पाहिजे, अशी आपली मागणी कायम आहे. तपास यंत्रणेला त्यांच्या विरोधात ठोस पुरावे मिळाले नसतील म्हणून त्यांचं नाव वगळलं असेल. पण, तरीही त्यांच्यावरील कारवाईसाठी आपण ठाम आहोत. त्यांची सखोल चौकशी व्हायला हवी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.