Koyna Dam Update : मोठा दिलासा! आपत्कालीन परिस्थितीवर मात करत कोयना धरणातून तब्बल 13.536 दशलक्ष युनिट जादा वीजनिर्मिती

गतवर्षी ५.२७ टीएमसीवर २३६.८०८ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली होती.
Koyna Dam Electricity
Koyna Dam Electricityesakal
Updated on
Summary

गतवर्षी सिंचनासाठी सोडलेल्या ४.२६ टीएमसी पाण्यावर १२.८५२ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली होती.

चिपळूण : कोयना धरण (Koyna Dam) तांत्रिक जलवर्षाच्या पहिल्या ४५ दिवसांत प्रचंड पाणीटंचाई व आपत्कालीन परिस्थितीवर मात करत तसेच अनेक दिवस तब्बल १००० मेगावॅट क्षमतेचा कोयना चौथा जलविद्युत निर्मिती (Electricity) टप्पा बंद असतानादेखील आत्तापर्यंत गतवर्षीच्या तुलनेत १३.५३६ दशलक्ष युनिट जादा वीजनिर्मिती झाली आहे.

पश्चिम वीजनिर्मिती ५.७८ तर पूर्वेकडे सिंचनासाठी सोडण्यात आलेल्या २.७७ अशा एकूण ८.५५ टीएमसी पाण्यावर २६३.१८८ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली आहे. नव्याने सुरू झालेल्या या तांत्रिक जलवर्षात पहिल्या ४५ दिवसांत कोयना जलविद्युत प्रकल्पात (Koyna Hydroelectric Project) पश्चिमेकडे ५.७८ टीएमसी पाण्यावर २५५.७०७ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली.

Koyna Dam Electricity
NCP Crisis : जयंत पाटलांचा कट्टर विरोधक अजितदादांच्या गळाला; 'या' नेत्याला मिळाली पक्षात येण्याची ऑफर!

गतवर्षी ५.२७ टीएमसीवर २३६.८०८ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली होती. या वेळी तुलनात्मक पश्चिमेकडे ०.५१ टीएमसी पाणीवापर जास्त झाल्याने १८.८९९ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती जास्त झाली आहे. पूर्वेकडे सिंचनासाठी सोडलेल्या पाण्यावर कोयना धरण पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून ते पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात येते.

Koyna Dam Electricity
Dudhsagar falls Video : दूधसागर धबधबा पाहायला जाताय? मग ही बातमी आधी वाचा, अन्यथा उठाबशा काढाव्या लागतील! व्हिडिओ व्हायरल

सिंचनासाठी सोडलेल्या २.७७ टीएमसी पाण्यावर ७.४८१ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली. गतवर्षी सिंचनासाठी सोडलेल्या ४.२६ टीएमसी पाण्यावर १२.८५२ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली होती. तुलनात्मक यावर्षी १.४९ टीएमसी पाणीवापर कमी झाल्याने ५.३७१ दशलक्ष युनिट कमी वीजनिर्मिती झाली आहे.

चारही जलविद्युत प्रकल्पांचा विचार करता आत्तापर्यंत एकूण ८.५५ टीएमसी पाण्यावर २६३.१८८ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली. त्याचवेळी गतवर्षी ९.५३ टीएमसी पाण्यावर २४९.६५२ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली होती.

Koyna Dam Electricity
NCP Crisis : 'करेक्ट कार्यक्रम व्हायचा नसेल तर दादांकडं या'; जयंत पाटलांवर निशाणा साधत कोणी दिला इशारा?

गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी एकूण ०.९८ टीएमसी पाणीवापर कमी झाला असला तरी पश्चिमेकडे जादा पाणीवापर झाल्याने यातून १३.५३६ दशलक्ष युनिट जादा वीजनिर्मिती झाली आहे. पश्चिम वीजनिर्मितीसाठी वर्षभरात ६७.५० टीएमसी पाणी लवादाचा आरक्षित कोटा आहे.

पाणीटंचाईच्या काळात एकीकडे सिंचनासाठी काटकसरीने पाणीवापर करताना दुसरीकडे अशा आव्हानात्मक परिस्थितीतही वीजनिर्मितीची वाटचाल समाधानकारक आहे. धरण निर्मितीनंतर पहिल्यांदाच २०२१ मध्ये ८२.६४ टीएमसी पाणी पश्चिम वीजनिर्मितीसाठी वापरले तर गतवर्षी सिंचनासाठी ३६.०५ टीएमसी पाणीवापर झाला.

- संजय चोपडे, मुख्य अभियंता महानिर्मिती पोफळी

Koyna Dam Electricity
Rain Update : कोल्हापुरात पाणलोट क्षेत्रात मुसळधार; 'या' 14 धरणांच्या पाणी पातळीत मोठी वाढ, जिल्ह्यात आज Orange Alert

‘कोयना’त २७.२७ टीएमसी पाणीसाठा

कोयना धरणातील एकूण १०५ टीएमसी साठ्यापैकी २७.२७ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. तर, आलमट्टी धरणातील एकूण १२३ टीएमसी पैकी २६.९३ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. गेल्या दोन दिवस सुरु असलेल्या पावसामुळे हळू हळू पाणीसाठा वाढत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.