ट्विटर काय कोर्ट आहे का? ही शेवटची पत्रकार परिषद; क्रांती संतापली

क्रांती रेडकर यांनी त्या आरोपांना फेटाळून लावलं.
Kranti Redkar
Kranti RedkarTeame Sakal
Updated on

नवाब मलिक यांनी समोर आणलेल्या पत्रांवर क्रांती रेडकर यांनी आज प्रतिक्रिया दिली. पत्रकार परिषदेत बोलताना त्या म्हणाल्या की, अशी पत्रं कोणीही लिहू शकतो, ज्या व्यक्तीनं आरोप केले आहेत त्यानं ते खुलेपणानं करावेत. सगळ्या काही छुप्या पद्धतीनं सुरु आहे. त्या पत्रांना काहीही आधार नाही. हे लक्षात घेण्याची गरज आहे. त्या पुराव्यांना काहीही अर्थ नाही. आरोपही खोटे आहेत. पुढे बोलताना असंही म्हणाल्या की, हे प्रकरण कोर्टात जाऊ द्या प्रकरण म्हणजे खरे खोटे समोर येईल. व्टिटरबाजी सुरु आहे. मी पण काहीही लिहू शकते. मला असे वाटते की, वानखेडे गावाचे सर्टिफिकेट पाहा. पूर्ण गाव तर सर्टिफिकेट तयार कसं करेल. त्या लोकांचा रिसर्च कमी झाला आहे.

मलिक यांची रिसर्च टीम कमी पडली आहे. आम्ही ऑनलाईन कागदपत्रं दिली आहे. आणखी कितीवेळा सांगायचं. आम्ही आता कंटाळलो आहे. पुराव्यांविषयी सांगून. व्टिटर हे कोर्ट आहे का, ते आरोप सिद्ध झाले तर बोला ना, ज्या माणसाचे 15 वर्ष रेकॉर्ड क्लिन आहे. त्याच्यावर अशाप्रकारचे आरोप करता याला काय म्हणणार? असा सवालही क्रांती यांनी यावेळी केला.

यावेळी क्रांतीनं आपल्याला जीवे माऱण्याच्या धमक्या येत असल्याचे सांगितले. मला माझ्या कुटूंबियांना लटकवून टाकण्याच्या धमक्या दिला गेल्या आहेत. असे प्रकार सुरु आहेत. त्यामुळे आम्ही सर्व घाबरुन गेलो आहोत. अशा परिस्थितीत माध्यमांनी आम्हाला खूप सहकार्य केलं आहे. असेही क्रांतीनं यावेळी सांगितलं. जो काही प्रकार सुरु आहे. त्यासगळ्यात नेहमी सत्याचा जय होतो हे लक्षात ठेवावे. वानखेडे यांना हटविण्यासाठी सारं सुरु असून त्यामागे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप क्रांतीनं केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.