'दाऊद चॅट्स' बनावट; खोट्या अकाऊंटविरोधात क्रांतीने केली तक्रार

nawab malik and kranti redkar
nawab malik and kranti redkar
Updated on

मुंबई: महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप केले आहेत. (Nawab Malik Vs Sameer Wankhede) त्यानंतर आता त्यांनी पुन्हा एक नवीन ट्विट करून 'ओह माय गॉड' अशी प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये त्यांनी वानखेडेंच्या पत्नी क्रांती रेडकर (kranti redkar) यांच्या चॅटचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. याबाबत आता क्रांती रेडकर यांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

nawab malik and kranti redkar
''पुरावा दिला तर बक्षीस देईन'', मलिकांनी शेअर केला क्रांतीच्या चॅटचा स्क्रीनशॉट

क्रांती रेडकर यांनी तक्रार दाखल केल्यानंतर म्हटलंय की, माझ्या नावाचे एक खोटे ट्विटर हँडल तयार करण्यात आले असून त्याद्वारे खोटे चॅट्स देखील करण्यात आले आहेत. या बनावट हँडलने माझा प्रोफाईल फोटो देखील वापरला आहे. या बनावट ट्विटर हँडलने केलेले चॅट्स आज नवाब मलिकांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर टाकले आहेत. कसलीही शहानिशा न करता हे चॅट्स माझे असल्याचं ठरवून त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर ते माझ्या नावे पोस्ट केले आहेत, अशी तक्रार क्रांती रेडकर यांनी केली आहे.

काय म्हणाल्या क्रांती रेडकर?

आपल्या नावाने व्हायरल होत असलेल्या खोट्या, बनावट व्हॉट्स अ‍ॅप चॅट्सविरोधात तक्रार दाखल करणार असल्याचं अभिनेत्री क्रांती रेडकरने यांनी एका ट्विटद्वारे स्पष्ट केलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी ट्विटरवर व्हॉट्स अ‍ॅप चॅट्सचा स्क्रीनशॉट पोस्ट केला होता. 'हे खोटे चॅट्स तयार करण्यात आले आहेत आणि त्यात काहीच तथ्य नाही. माझं आजवर कोणाशीही अशा पद्धतीने संभाषण झालेले नाही. पुन्हा एकदा पडताळणी न करताच पोस्ट केलं गेलंय. मी याविरोधात मुंबई सायबर क्राइम सेलकडे तक्रार दाखल करणार आहे. ही आमची संस्कृती नाही आणि अशी आमची भाषाही नाही', असं क्रांतीने लिहिलंय.

nawab malik and kranti redkar
चॅट्समध्ये दाऊदचा उल्लेख; क्रांती रेडकर दाखल करणार तक्रार

काय होते नवाब मलिकांचे स्क्रीनशॉट्स?

मलिकांनी शेअर केलेल्या स्क्रीनशॉटमध्ये ''कोणीतरी एक व्यक्ती क्रांती रेडकर यांना मलिकांविरोधातील पुरावे असल्याचे सांगतात. क्रांती रेडकर कुठला पुरावा आहे, असं विचारतात. मलिकांचा दाऊदसोबत फोटो असल्याचं ती व्यक्ती सांगतेय. त्यानंतर मलिकांविरोधात पुरावा दिला तर मी बक्षीस देईल, असं क्रांती रेडकर रिप्लाय देतात.'' हे स्क्रीनशॉट शेअर करताना मलिकांना ओ माय गॉड, असं कॅप्शन दिलं असून आज सकाळीच मला हे मिळाल्याचं ते सांगतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.