Krushi Purskar 2024: चार वर्षे रखडलेले कृषी पुरस्कार विजेते शेतकरी मुंबई दाखल; पण सुविधांपासून वंचित; शासनाचा अजब कारभार

गेल्या चार वर्षांपासून रखडलेल्या महाराष्ट्र शासनाच्या विविध कृषी पुरस्कारांचं उद्या मुंबईतील राजभवन इथं वितरीत केले जाणार आहेत.
Farmer
Farmer
Updated on

मुंबई : गेल्या चार वर्षांपासून रखडलेल्या महाराष्ट्र शासनाच्या विविध कृषी पुरस्कारांचं उद्या मुंबईतील राजभवन इथं वितरीत केले जाणार आहेत. पण जे पुरस्कार विजेते शेतकरी यासाठी आपल्या बायका मुलांसह मुंबईत दाखल झाले आहेत, त्यांचे हाल होत आहेत. निकृष्ट दर्जाच्या हॉटेलमध्ये त्यांची सोय केल्यानं त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

Farmer
Ladki Bahin Yojana: खुशखबर! 'लाडकी बहीण'चा तिसरा हप्ता जमा होण्यास झाली सुरूवात; पैसे आले की नाही 'असे' करा चेक

नेमकं काय घडलंय?

सन 2020 सालापासून रखडलेले महाराष्ट्र शासनाचे विविध कृषी पुरस्कार उद्या राजभवन इथं महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या हस्ते वितरित केले जाणार आहेत. यासाठी राज्यभरातून 488 शेतकरी आणि त्यांचे कुटुंबीय मुंबईत दाखल झाले आहेत. मात्र कृषी विभागाकडून या शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांची राहण्याची व्यवस्था निकृष्ट दर्जाच्या हॉटेल्समध्ये करण्यात आली आहे.

Farmer
Tata Factory Fire: टाटा समूहाच्या आयफोन प्लांटला भीषण आग; 100हून अधिक पोलिस तैनात, पाहा- VIDEO

शेतकरी मुंबईत दाखल झाल्यानंतर काल रात्रीपासून आज दुपारी दोन वाजेपर्यंत अनेक शेतकऱ्यांना राहण्यासाठी रूम्स उपलब्ध झालेल्या नाहीत. ज्यांना रूम उपलब्ध झाल्या आहेत त्यांना आंघोळीसाठी पाणी मिळालेलं नाही. तसंच चहा-नाश्ता आणि जेवणाची सोय देखील उपलब्ध झालेली नाही.

एकीकडं शासनानं या पुरस्कार सोहळ्यावरती करोडो रुपयांचा खर्च केला असताना शेतकऱ्यांना राहण्यासाठी मात्र निकृष्ट दर्जाचे हॉटेल्स उपलब्ध करून दिल्यामुळं शेतकऱ्यांकडून प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.