Maratha Reservation : मनोज जरांगे पाटलांना तात्काळ अटक करा; कुणबी सेनेची अजब मागणी

maratha reservation protest
maratha reservation protest
Updated on

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. मराठ्यांना आरक्षण देण्यात यावं यासाठी जालन्यातील अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचं आदोलन सुरू असून राज्य सरकार त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करत आहे. यादरम्यान आता मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन बेकायदेशीर असून त्यांना अटक करा अशी मागणी कुणबी सेनेचेो महाराष्ट्र प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना याबद्दल पत्र लिहीलं आहे.

मराठा आराक्षणासाठी जरांगे यांचं मागील १३ दिवसांपासून उपोषण सुरु आहे. यादरम्यान राज्य सरकारकडून जरांगे यांच्यासोबत वेळोवेळी चर्चा करण्यात आली. मात्र या चर्चेतून तोडगा निघाला नाही. यानंतर काही दिवसांपूर्वी (७ सप्टेंबर) राज्य सरकारने आरक्षणासंदर्भात एक जीआर काढला होता.

मात्र त्यातील वंशवाळीचा मुद्दा हटवावा तसेच मराठा समाजाला सरसकट कुणबी जातप्रमाणपत्र द्या, अशा मागणी जरांगे पाटील यांनी केली. याबाबत काल (शुक्रवार) नवीन जीआर काढण्यात आला, मात्र या जीआर मध्ये दुरुस्ती झाली नसल्याने जरांगे यांनी त्यांचं उपोषण सुरुच ठेवलं. यानंतर आता कुणबी समाज आक्रमक झाला असून जरांगे पाटलांना तात्काळ अटक करण्याची मागणी कुणही सेनेकडून करण्यात आली आहे. साम टीव्हीने याबद्दलचे वृत्त दिले आहे.

maratha reservation protest
Maratha Reservation : मनोज जरांगे आंदोलन आणखी तीव्र करणार! सरकारशी चर्चा फिस्कटली, आजपासून औषध-पाणी बंद

हा ओबीसींवर अन्याय

मराठा महासंघाच्या वतीने राज्यात हिंसक आंदोलन सुरु आहे. यापूर्वी मराठा समाजाला दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने घटनेच्या चौकटीत बसत नाही म्हणून रद्द केलं. मराठा समाजाला आरक्षण देण्यास कुणबी समाजाचा विरोध नाही. ही भूमिका आम्ही वेळोवेळी स्पष्ट केली आहे. मात्र मराठा समजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिल्यास ओबीसीमध्ये असलेल्या ३७० च्यावर जातींवर हा अन्याय असेल, अशी भूमिका कुणबी सेनेचे महाराष्ट्र प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी घेतली आहे.

maratha reservation protest
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून CM शिंदेंनी बोलवली सर्वपक्षीय बैठक; उद्धव ठाकरे उपस्थित राहणार?

जरांगे पाटलांना अटक करा...

मनोज जरांगे पाटील सरकारवर दबाव टाकून राज्यात कायदा सुव्यवस्थेची स्थिती निर्माण करत आहेत. त्यांना पोलिसांनी तत्काळ अटक करावी. त्यांना उपोषणावरुन उठवावे. त्यांच्या सनदशीर आणि लोकशाही मार्गाने सुरु असलेल्या आंदोलनाला आमचा विरोध नाही. मात्र त्यांच्याजवळ कोणताही दस्तावेज नसताना वंशावळीची अट रद्द करण्याची त्यांची मागणी भारतीय राज्यघटनेची पायमल्ली करणारी आहे, असंही पाटील म्हणाले.

मराठा आरक्षणासंदर्भात शासनाने समिती नेमलेली असताना घाईने जीआर काढणे ही ओबीसी आणि कुणबी समाजावर अन्याय करणारी कृती आहे. शासन मनोज जरांगे यांचं उपोषण सदनशीर मार्गाने उठवण्याचा प्रयत्न करत असताना जरांगे आडमुठेपणाची भूमिका घेत आहेत. पोलीस कारवाई करुन महाराष्ट्रात निर्माण झालेला तणाव दूर करण्याची विनंती केल्याचे कुणबी सेनेचे महाराष्ट्र प्रमुख विश्वनाथ पाटील म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.