Ladki Bahin Scheme: 'लाडकी बहीण'साठी आता घरबसल्या करता येणार अर्ज! नवं अ‍ॅप सुरु; जाणून घ्या कसा भरायचा अर्ज?

त्यामुळं ज्या महिलांना अर्ज करताना अडचणी येत आहेत त्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
mukhyamantri mazi ladki bahan yojana
mukhyamantri mazi ladki bahan yojana esakal

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला मिळालेला उत्स्फुर्त प्रतिसाद आणि त्यासाठी होत असलेली आर्थिक लूट लक्षात घेता आता या योजनेच्या लाभार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी नवं अॅप डेव्हलप करण्यात आलं आहे. त्यामुळं ज्या महिलांना अर्ज करताना अडचणी येत आहेत त्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. (Ladki Bahin Yojana can now be applied from home new Nari Shakti Doot app launched Know how to fill the application)

mukhyamantri mazi ladki bahan yojana
Monsoon Session 2024 : लाडकी बहीण योजना! महिन्याला मिळणार दीड हजार रुपये? मध्य प्रदेशमध्ये गेम चेंजर ठरलेली योजना महाराष्ट्रात? काय आहेत निकष?

नारीशक्ती दूत असं या अॅपचं नाव आहे. ही योजना लागू झाल्यानंतर लगेचच हे अॅप सुरु होणार होतं परंतू तांत्रिक कारणांमुळं ते बंद ठेवण्यात आलं होतं. पण आता यातील तांत्रिक तृटी दूर करण्यात आल्या आहेत. या अॅपच्या माध्यमातून आता लाडकी बहीण योजनेसाठी घर बसल्या अर्ज करता येणार आहे. यामध्ये आता उत्पन्न आणि रहिवासी दाखल्याचा कॉलम देखील सुरु करण्यात आला आहे. येत्या दोन दिवसांत हे अॅप अपडेट होणार आहे.

mukhyamantri mazi ladki bahan yojana
Ladaki Bahin Scheme: महिलांच्या मागणीनंतर 'लाडकी बहीण' योजनेला मुदतवाढ! अजित पवारांची सभागृहात घोषणा

अॅप कसं वापरायचं?

गुगल प्ले स्टोअरवर हे अॅप उपलब्ध आहे. त्यात सुरुवातीला मोबाईल क्रमांक टाकून लॉगिन करायचं आहे. त्यानंतर त्यातील प्रोफाईलमध्ये आपली माहिती भरुन नोंदणी करायची आहे. यामध्ये तुम्ही कुठल्या गटात बसता याचा पर्याय निवडायचा आहे. यामध्ये बचत गटाचे सदस्य, गृहिणी आणि इतर असे पर्याय आहेत. या सर्व गोष्टी यशस्वीरित्या जर भरल्यानंतर महिलांना लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करता येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com