Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत नवी अपडेट; आता एकाच घरातील 'इतक्या' महिलांना मिळणार लाभ

राज्य सरकारनं महिलांसाठी आणलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नियमांमध्ये आता नवा बदल झाला आहे.
CM ladki Bahin Yojana
CM ladki Bahin Yojanaesakal

मुंबई : राज्य सरकारनं महिलांसाठी आणलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नियमांमध्ये आता नवा बदल झाला आहे. त्यानुसार, आता एकाच घरातील किती महिलांना या योजनेचा लाभ मिळेल हे निश्चित करण्यात आलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात याची माहिती दिली. (Ladki Bahin Yojana how many women in one household will get benefit need to know)

फडणवीस म्हणाले, "एक मोठी मागणी येत होती की योजनेचा गैरवापर होऊ नये यासाठी एका कुटुंबातील दोन महिलांनाच याचा लाभ देण्याचा निर्णय झालेला आहे. यामध्ये एक विवाहित असेल तर दुसऱ्या अविवाहित महिलेला देखील याचा लाभ मिळेल. त्यामुळं यामध्ये कुठलीही विषमता येऊ नये याची काळजी घेण्यात आली आहे"

CM ladki Bahin Yojana
Bhushi Dam: भुशी डॅम जवळ वाहून गेलेल्या कुटुंबासाठी प्रत्येकी 5 लाखांची भरपाई; अजित पवारांची घोषणा

त्यामुळं आम्ही कुटुंब नियोजन करुन चूक केली का? असा जो प्रश्न उपस्थित होऊ शकतो. त्या सवालाचं उत्तर देखील या नव्या नियमाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत स्पष्ट केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com