Shyam Manav : ''पुरुषांप्रमाणे स्त्रियाही व्यसनाधीन आहेत'', लाडकी बहीण योजनेला श्याम मानवांच्या उपस्थितीत विरोध

Purogami Melava : एका वक्त्याने करदात्यांच्या पैशातून मोफत लाभाच्या योजना चालवू नयेत, असं म्हटलं. जर आपण एखाद्या आघाडीला पाठिंबा देणार असू तर महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपयांची मोफत मदतीची लाडकी बहीण योजनेला विरोध करायला हवा, अशी मागणी एका वक्त्याने केली. श्याम मानव यांच्या उपस्थितीत झालेल्या या मागणीला श्याम मानव यांनी मात्र कुठलंही उत्तर दिलं.
Shyam Manav
Shyam Manavesakal
Updated on

Shyam Manav News : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांनी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीसोबत काम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी बुधवारी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भाजपकडून कसा दबाव होता, असं सांगत त्यांच्याकडे चार प्रतिज्ञापत्र पाठवले होते, असा गौप्यस्फोट केला होता.

नागपुरात पार पडलेल्या पुरोगामी संघटनांच्या मेळाव्यात लाडकी बहीण योजनेला विरोध दर्शवण्यात आला आहे. ''पुरुषांसारखंच स्त्रियाही व्यसनाधीन आहेत, त्यामुळे हा भेदभाव का? पंधराशे रुपये फक्त लाडक्या बहिणीलाच का?'' असा प्रश्न मेळाव्यामध्ये उपस्थित करण्यात आला.

Shyam Manav
Ajit Pawar On Flood : आता पाऊस आटोक्यात आला आहे, पण.. अजित पवार यांनी घेतला पूरस्थितीचा आढावा, नागरिकांना म्हणाले..

विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यातील पुरोगामी संघटनांनी कोणती राजकीय भूमिका स्वीकारायची यासंदर्भात बुधवारी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्याम मानव यांच्या पुढाकाराने पुरोगामी संघटनांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये काही वक्त्यांनी अजब मागण्याही केल्या.

एका वक्त्याने करदात्यांच्या पैशातून मोफत लाभाच्या योजना चालवू नयेत, असं म्हटलं. जर आपण एखाद्या आघाडीला पाठिंबा देणार असू तर महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपयांची मोफत मदतीची लाडकी बहीण योजनेला विरोध करायला हवा, अशी मागणी एका वक्त्याने केली. श्याम मानव यांच्या उपस्थितीत झालेल्या या मागणीला श्याम मानव यांनी मात्र कुठलंही उत्तर दिलं.

Shyam Manav
Bigg Boss Season 18 : 'या' तारखेला येणार सलमानचा बिग बॉस सीजन १८ ; 'हा' आहे बिग बॉसच्या घरात जाणारा पहिला स्पर्धक

दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या टीकेला श्याम मानव यांनी उत्तर दिलं आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष हे माझ्याबद्दल बोलले यासाठी त्यांचा आभारी आहे. त्यांची राजकीय संस्कृती काय आहे हे कळलं, त्यासाठी आभारी आहे. बावनकुळे यांचं आकलन ग्रेट आहे. शाहू ,फुले आंबेडकर यांनी महाराष्ट्र पुरोगामी बनवला आहे. पुरोगामी कार्यकर्त्यांबद्दल अशा पद्धतीने व्यक्त होत असाल तर यातून तुमची संस्कृती दिसून येतेय, असं श्याम मानव म्हणाले.

मानव पुढे म्हणाले की, भाजपचे लोक हे धीरेंद्र महाराज यांना घेऊन फिरत होते. ते छुत-अछूत भेदभाव पाळतात. महात्मा गांधींबद्दल अपशब्द बोलणारे संभाजी भिडे आमचे गुरूजी आहे, असं म्हणणाऱ्यांची (देवेंद्र फडणवीस) ही संस्कृती असेल तर तुम्ही तसेच वागणार.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.