Lalit Patil Case Update: ललित पाटील प्रकरणात मोठी अपडेट; आणखी एका वैद्यकीय अधिकाऱ्याला पोलिसांनी केलं अटक

ड्रग्समाफिया ललित पाटील प्रकरणी चौकशी सुरू असतानाच आणखी एका आधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे.
Lalit Patil Case
Lalit Patil CaseSakal
Updated on

ड्रग माफिया ललित पाटील प्रकरणी चौकशी सुरू असतानाच आणखी एका आधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी जसजसी पुढे सरकत आहे तशी आरोपींची संख्येतही वाढ होताना दिसत आहे. ललिल पाटील प्रकरणात आणखी एका वैद्यकीय अधिकाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे.

अमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरणात ससून रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण दादासाहेब देवकाते (वय ४०) याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. ससून रुग्णालयात सर्वाधिक काळ डॉ. देवकाते याने ललित पाटील याच्यावर वैद्यकीय उपचार केल्याचे चौकशी अहवालात समोर आले आहे.

ललितचा ससून रुग्णालयातील मुक्काम वाढविण्यासाठी त्याला मदत केल्याच्या आरोपावरून डॉ. देवकाते याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Lalit Patil Case
Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट! 6 डिसेंबर रोजी सुप्रीम कोर्टात पार पडणार महत्त्वाची सुनावणी

ललित पाटीलला मदत केल्याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्याला आधी निलंबित करण्यात आलं होतं. निलंबित झाल्यानंतर काल या अधिकाऱ्याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. ललित पाटीलला त्याच्या आजारात आणि पळून जाण्यास देखील देवकाते यांनी मदत केल्याचा पुणे पोलिसांचा आरोप आहे. डॉ. प्रवीण देवकाते यांच्या निगराणीखाली ललित पाटील ससूनमध्ये उपचार घेत होता.

पुणे पोलिसांनी काल येरवडा कारागृहातील वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय मरसाळे याला अटक केली होती. त्यानंतर ससून रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. देवकाते यांना सोमवारी रात्री उशिरा ताब्यात घेतले.

ललित पाटील येरवडा कारागृहात असताना त्याला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. ससून रुग्णालयाच्या परिसरात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी २९ सप्टेंबर रोजी छापा टाकून सव्वादोन कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले होते. त्यानंतर २ ऑक्टोबर रोजी ललित पाटील ससूनमधून पसार झाला होता. मुंबई पोलिसांनी ललित पाटील याला अटक केली होती. तर पुणे पोलिसांनी ललितचा भाऊ भूषण आणि त्याचा साथीदार अभिषेक बलगवडे याला अटक केली होती.

Lalit Patil Case
MP Election : चिप असलेले कोणतीही मशीन हॅक होऊ शकतं; मोठ्या पराभवानंतर माजी मुख्यमंत्र्यांनी EVM वर उपस्थित केले प्रश्न

डॉ प्रवीण देवकाते हे ससून रुग्णालयात ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून कार्यरत होते. देवकाते यांनी ललित पाटीलचा ससून रुग्णालयातील मुक्काम वाढवला, अशी माहिती तपासातून समोर आली आहे.

डॉ. देवकाते ललित याचा भाऊ भूषण पाटील आणि साथीदार अभिषेक बलकवडे या दोघांच्या संपर्कात होता. ललित पाटील पळून जाण्याचा काही दिवस आधी डॉ. देवकाते यांनी भूषण याच्याशी संपर्क केला होता. वैद्यकीय शिक्षण विभागाने या आधीच देवकाते यांचे निलंबन केले आहे.

Lalit Patil Case
Assembly Winter Session: नागपूरचे अधिवेनशन ठरणार 'पावसाळी'! विदर्भावर चक्रीवादळाचे सावट, 'या' दिवशी पावसाची शक्यता

या गुन्ह्यात पुणे पोलिसांनी केलेला तपासात आतापर्यंत एकूण १४ आरोपींचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. ससून रुग्णालयातील कर्मचारी महेंद्र शेवते (वय ५७, रा. रक्षकनगर, खडकी) याच्यासह कारागृह रक्षक मोईस अहमद शेख (वय ३०, रा. मूळ रा. देगलूर, नांदेड), समुपदेशक सुधाकर सखाराम इंगळे (वय ४४) यांनाही या गुन्ह्यात नुकतीच अटक करण्यात आली आहे. यांच्याकडे चौकशी केल्यानंतर या गुन्ह्यात डॉ. देवकाते याचा सहभाग दिसून आला आहे..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.