पुणेः ललित पाटील प्रकरणामध्ये आता आणखी एक अपडेट हाती येत आहे. या प्रकरणामध्ये रेहान शेख अन्सारी उर्फ गोलू याला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ड्रग्जचा कारखाना उभारण्यासाठी रेहान शेखने ललित पाटीलला मदत केल्याची माहिती मिळत आहे.
नाशिकमध्ये एमडी ड्रग्स कारखान्याचा सेटअप उभारण्यासाठी अन्सारीने ललित पाटील याला मदत केली होती. तसेच अन्सारी हा ड्रग्सची मोठ्या प्रमाणात विक्री करत होता. नाशिकमधील कारखाना बांधायला गोलूने मदत केल्याची माहिती आहे.
ड्रग्सची विक्री, त्यातून येणारे पैसे आणि कारखाना या गोष्टींची होती जबाबदारी रेहान शेखकडे होती. पुणे पोलिसांनी मुंबई पोलिसांकडून रेहान अन्सारीचा ताबा घेतला आहे. ललित पाटील प्रकरणात रेहान अन्सारीदेखील आरोपी आहे. त्याला मुंबई पोलिसांनी ठाण्यातून २० ऑगस्ट रोजी अटक केली होती.
दरम्यान, ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी ठाकरे गटाच्या वतीने नाशिकमध्ये मोर्चा काढण्यात आला होता. खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वात हा मोर्चा संपन्न झाला. राऊत यांनी महाराष्ट्र सरकारवर हल्लाबोल करत जोरदार टीकास्र सोडलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.