धुळे जिल्ह्याला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला गेला आहे. जिल्ह्यातील खोरी टीटने भागात ही गारपीट झाली आहे. आधीच शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.
धुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दुपारपासून गारपिटीसह साक्री तालुक्यातील बहुतांश ठिकाणी वादळी वारा व मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली.
जवळपास एक ते दीड तास चाललेल्या या मुसळधार अवकाळी पावसामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, यामध्ये गहू, हरभरा, त्याचबरोबर कांदा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे,
सकाळपासूनच ढगाळ वातावरण असताना दुपारनंतर अचानकपणे अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली, या पावसामध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्यामुळे सर्वत्र बर्फाची चादर पसरल्याचे दिसून येत आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने हातात तोंडाशी आलेला घास हिरवल्या गेल्याने शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे.
कुषीमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, धुळ्यात तात्काळ पंचनामे करण्यात येणार आहेत. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकार मदत करणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.