माण तालुक्यातील नरवणे गावाच्या नावाशी मनोज नरवणे यांच्या आडनावाचे साम्य आहे.
गोंदवले (सातारा) : आमच्या गावाच्या नावाचे आडनाव असणारे मनोज नरवणे (Manoj Naravane) यांची भारतीय संरक्षण दल (Indian Defense Forces) प्रमुखपदी नियुक्ती होणार असल्याची चर्चा असून त्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. ते आमच्या नरवणे गावचे रहिवाशी नसले तरी त्यांच्यामुळे गावाच्या नावलौकिकात भरच पडली असल्याचा आनंद नरवणेकर (ता. माण) ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. नरवणे यांच्या नियुक्तीबाबतचा मेसेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
नुकतेच हेलिकॉप्टर दुर्घटनेत संरक्षण दलाचे प्रमुख बिपीन रावत (Bipin Rawat) व त्यांच्या पत्नी मधूलिका यांच्यासह इतर अकरा अधिकारी मृत्युमुखी पडले. या घटनेनंतर भारतीय संरक्षण दलाचे प्रमुखपद रिक्त पडले होते. हे मुख्य जबाबदारीच्या पदावर तातडीने नियुक्ती करणे गरजेचे असल्याने संरक्षण विभागातून लष्कर प्रमुख असणाऱ्या मनोज नरवणे यांची नियुक्ती करण्याबाबत चर्चा सुरू आहे. या निर्णयापूर्वीच नरवणे यांच्या अभिनंदनाचे संदेश सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात फिरत आहेत.
माण तालुक्यातील (Maan Taluka) नरवणे गावाच्या (Naravane Village) नावाशी मनोज नरवणे यांच्या आडनावाचे साम्य आहे. त्यामुळं सातारा जिल्ह्याचे सुपुत्र व माण तालुक्याची शान असलेले नरवणे गावचे सुपुत्र मनोज नरवणे अशा आशयाचा मेसेज देखील कालपासून मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मनोज नरवणे हे मूळचे पुणे येथील असून त्यांच्या मातोश्री जुन्या काळात पुणे आकाशवाणी केंद्रात निवेदिका म्हणून कार्यरत होत्या, अशीही माहिती मिळत आहे. नरवणे कुटुंबीयांचा माण तालुक्यातील नरवणे गावाशी कधी संपर्क देखील आलेला नाही. केवळ त्यांच्या आडनाव व गावाच्या नावात साम्य असल्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून गैरसमज निर्माण झाला आहे.
आमच्या गावाच्या नावाचे आडनाव असणारे मनोज नरवणे हे भारतीय सरसेनाप्रमुख म्हणून नियुक्ती झाल्यास आमच्यासाठी खूप अभिमानास्पद बाब आहे. ते आमच्या गावचे नसले तरी नावाच्या साम्यामुळे नरवणे गावाचा नावलौकिक आणखी वाढल्याचा आनंद आहे.
अरुण काटकर, निवृत्त पोलीस अधिकारी, नरवणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.