लता दीदींनी तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले अन् देवीसमोर गायले कवन

लता मंगेशकर यांनी तुळजाभवानी माता मंदिराच्या गाभाऱ्यात 'सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्रंबके गौरी नारायणी नमोस्तुते' हे कवन गायले.
Lata Mangeshkar News
Lata Mangeshkar Newsesakal
Updated on

तुळजापूर (जि.उस्मानाबाद) : २८ वर्षांपूर्वी तुळजाभवानी मंदिरात लता मंगेशकर यांनी तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन देवीसमोर कवन गायले याच्या स्मृती आज ही कायम आहेत. तुळजाभवानी मंदिरात १७ फेब्रुवारी १९९४ रोजी लता मंगेशकर यांनी तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. लता मंगेशकर (Lata Mangeshkar) सोलापूर येथे एका कार्यक्रमासाठी आल्या होत्या. त्यावेळी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास लता मंगेशकर यांनी तुळजाभवानी मातेचे (Tuljabhavani Mata) दर्शन घेतले. यावेळी तत्कालीन राज्याचे सांस्कृतिक मंत्री विजयसिंह मोहिते पाटील, तसेच सोलापूरचे तत्कालीन महापौर मनोहर सपाटे, उस्मानाबादचे (Osmanabad) जिल्हाधिकारी अनिल पवार, तुळजाभवानी मातेचे भोपे पुजारी आप्पासाहेब पाटील, मोहनराव पाटील तसेच तुळजापूरातील (Tuljapur) गायक हरीनमा जवंजाळ आदी उपस्थित होते. (Lata Mangeshkar Sang Kawan Before Tuljabhavani Mata In Tuljapur Of Osmanabad)

Lata Mangeshkar News
लता मंगेशकर त्यांचं गाणं रेकॉर्ड झालं की पुन्हा ऐकायच्या नाहीत...का?

यावेळी लता मंगेशकर यांनी तुळजाभवानी मातेच्या गाभाऱ्यात 'सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्रंबके गौरी नारायणी नमोस्तुते' हे कवन गायले. तुळजाभवानी मंदिरातील विविध स्थळाबाबत भोपे पुजारी आप्पासाहेब पाटील तसेच हरीनमा जवंजाळ यांनी लता मंगेशकर यांना माहिती दिली. शहरातील काही मोजके नागरिक आणि पत्रकार यावेळी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.