Rajiv Satav : दिवंगत राजीव सातव यांच्या मातोश्री रजनी सातव यांचं निधन

माजी मंत्री तथा काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या रजनी सातव (वय ७६) यांचे रविवारी सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास नांदेड येथे उपचार सुरू असताना निधन झाले. श्रीमती सातव यांनी मंत्री पदाच्या कार्यकाळात त्यांनी कळमनुरीची ओळख निर्माण केली होती.
Rajiv Satav
Rajiv Satavesakal
Updated on

कळमनुरी : माजी मंत्री तथा काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या रजनी सातव (वय  ७६) यांचे रविवारी सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास नांदेड येथे उपचार सुरू असताना निधन झाले. श्रीमती सातव यांनी मंत्री पदाच्या कार्यकाळात कळमनुरीची ओळख निर्माण केली होती.

रजनी सातव यांचा जन्म १३ जुलै १९४९ पुणे येथे झाला होता. शालेय शिक्षण पुणे येथे झाल्यानंतर त्यांनी बीएससी पदवी संपादन करून लॉ ची पदवी संपादन केली होती. १९७१ मध्ये कळमनुरी तालुक्यातील मसोड येथील डॉ. शंकरराव सातव यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यानंतर त्यांनी कळमनुरी तालुक्यात सामाजिक कार्य व वकिली व्यवसाय सुरू केला. यामधून १९८०मध्ये त्यांनी विधानसभा निवडणूक लढवून विजय मिळवला. १९८२ मध्ये त्यांचा बाबासाहेब भोसले यांच्या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. त्यानंतर पतीच्या निधनानंतरही त्यांनी सामाजिक व राजकीय कार्य सुरू ठेवले.         

१९८३- ८५ या काळात वसंतदादा यांच्या मंत्रिमंडळात त्यांचा समावेश करण्यात आला. १९८५ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी दुसऱ्यांदा विजय मिळवला. यावेळी शिवाजीराव निलंगेकर यांच्या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. त्यानंतर कापूस पणन महासंघावर संचालिका म्हणून त्यांची निवड करण्यात आली. याचदरम्यान पक्ष संघटनेमध्ये त्यांना तत्कालीन परभणी जिल्हा उपाध्यक्ष पद देण्यात आलं. त्यानंतरच्या राजकीय घडामोडीनंतर १९८६ मध्ये शंकरराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात त्यांना आरोग्य वैद्यकीय शिक्षण समाज कल्याण आदिवासी विकास राज्यमंत्री पद देण्यात आलं.

Rajiv Satav
R Ashwin Wife Post : अश्विनच्या पत्नीची इंस्टाग्रामवर इमोशनल पोस्ट; म्हणाली, आमच्या आयुष्यातील ते सर्वात कठीण 48 तास...

त्यानंतर महिला आर्थिक विकास महामंडळ अध्यक्ष पदही त्यांनी भूषवलं. १९८८ मध्ये शरद पवार यांच्या मंत्रिमंडळात त्यांना सार्वजनिक आरोग्य वैद्यकीय शिक्षण समाज कल्याण राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. महाराष्ट्र राज्यातील परिचारिका सेवा विषय समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला. १९९३ ते १९९९ या काळात त्यांनी दोन वेळा विधानपरिषद सदस्य म्हणून काम पाहिले. राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून त्यांचे कार्य उल्लेखनीय ठरले. रजनी सातव यांच्या कार्यकाळातच कळमनुरीमध्ये अनेक विकासकामे उभी राहिली. प्रियदर्शनी सेवा संस्थेच्या माध्यमातून त्यांनी कळमनुरी व परिसरात उच्च शिक्षणाची सुरुवात केली.

मुलगा खासदार स्वर्गीय राजीव सातव यांच्या अकाली निधनानंतर रजनी सातव मानसिक व शारीरिकदृष्ट्या खचल्या गेल्या होत्या. त्यामुळे राजकारणापासून त्या अलिप्त झाल्या होत्या. स्वर्गीय खासदार राजीव सातव यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव विधान परिषद सदस्य म्हणून कार्यरत आहेत. रजनी सातव यांची प्रकृती मागील काही दिवसापासून ठीक नसल्यामुळे त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते त्यातच त्यांना रविवारी उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले होते. तेथे त्यांचे सायंकाळी आठच्या दरम्यान निधन झाले. त्यांच्यावर सोमवारी ता.१९ दुपारी बारा वाजता कळमनुरी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()