रत्नागिरीत मुसळधार पावसाचा इशारा दिल्यानं उद्या जिल्हा प्रशासनानं शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस कोसळतोय खबरदारी म्हणून जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे.
भीमाशंकरमध्ये अजूनही वाहतुककोंडी असून आठ तासांपासून वाहतुककोंडीचा सामना प्रवाशांना करावा लागत आहे. भर पावसात वाहतुककोंडी सोडविण्यासाठी पोलीसांचे प्रयत्न सुरु आहे. भिमाशंकर-मंचर मार्गावर वाहतूककोंडी आहे.
नाशिकच्या मालेगावमध्ये वारकऱ्यांचा रास्ता रोको सुरु असून दुपारपासून पंढरपूरला जाण्यासाठी बस उपलब्ध न झाल्याने त्रस्त झालेल्या ग्रामीण भागातील वारकऱ्यांचा रास्ता रोको सुरु आहे. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात रास्ता रोको करण्यात आला.
पूजा खेडकर यांच्या विरोधात असलेल्या आरोपामुळे प्रशासनाकडून त्यांचा अकोल्यातील प्रशिक्षण कालावधी पुढे ढकलून वाशिममध्ये एक आठवडा काम करू देण्याबाबत विनंती केल्याची माहिती समोर आली आहे. उद्या अकोला येथे आदिवासी विकास विभागात प्रशिक्षण कालावधी होता. अकोला न जाता पूजा खेडकर वाशिममध्येच राहणार असल्याची माहिती आहे.
जम्मू-काश्मीरमधील केरन सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर (एलओसी) दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न भारतीय लष्कराने रविवारी हाणून पाडला. लष्कराने घुसखोरी करणाऱ्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. मात्र, अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
कात्रज : गुजर-निंबाळकरवाडीच्या नवलाईदरा तलावात एका महिलेचा मृतदेह पाण्यात तरंगत असल्याची माहिती कात्रज अग्निशामक दलाला रविवारी (ता. १४) सायंकाळी पावणेपाचच्या दरम्यान मिळाली. त्यानंतर अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी व पोलीसांनी मृतदेह बाहेर काढला. निर्मला एकनाथ साठे (वय ६०) रा. भारतनगर, गुजर-निंबाळकरवाडी असे महिलेचे नाव आहे.
विन्हेरे व दिवाणखवटी स्टेशन दरम्यान बोगद्याजवळ ट्रॅकवर माती आल्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक बंद झाली आहे. ट्रॅकवरील माती बाजूला करण्याचे काम सुरू आहे. वाहतूक पूर्ववत व्हायला आणखी ५ ते ६ तास लागणार आहेत.
खर्डी : आज दुपारी अडीच वाजताच्या सुमारास नाशिक-मुंबई मार्गावरील नवीन कसारा घाटात भल्या मोठ्या कंटेनर वाहनासह 5 कार गाड्यांचा विचित्र अपघात झाला. अपघातातील 9 जखमींना कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मुंबई नाशिक महामार्गाच्या मुंबईकडे जाणाऱ्या कंटेनरने समोर चालणाऱ्या 5 कार गाड्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. इथे क्लिक करा
कुकी समाजातील हल्लेखोरांनी आज मणिपूरमधील जिरीबाममध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलावर हल्ला केला. यामध्ये सीआरपीएफचा एक जवान शहीद झाला. तसेच एक सीआरपीएफ जवान आणि दोन पोलीस जखमी झाले आहेत. अजय कुमार झा असे शहीद जवानाची ओळख पटली आहे. सर्व जखमी जवानांवर जिरीबाम रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत.
पंढरपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 65 एकराची पाहणी केल्यानंतर चंद्रभागा नदीच्या पुलावर उभे राहून चंद्रभागा नदीची आणि पात्राचीही पाहणी केली. यावेळी त्यांनी चंद्रभागेच्या वाळवंटात अधिक स्वच्छता करावी, अशी प्रशासनाला सूचना दिली.
नवी दिल्ली : दिवसाढवळ्या दिल्लीच्या GTB हॉस्पिटलमध्ये तीन बदमाशांनी एका रुग्णावर गोळ्या झाडल्या, ज्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना ४ वाजण्याच्या सुमारास घडली. रुग्णाला काही आठवड्यांपासून वॉर्ड क्रमांक-24 मध्ये दाखल करण्यात आले होते. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. रियासदुद्दीन (वय ३२) असे मृताचे नाव आहे. रियासदुद्दीन हा खजुरी येथील रहिवासी आहे.
विरार : विरार पूर्व कारगिल नगर येथील जयदीप शाळेमागील नाल्याशेजारी असलेल्या चाळीतील एक खोली मागील दोन दिवसांच्या संततधार पावसामुळे आज सकाळी कोसळली. सदर खोलीत कुणीही राहत नसल्याने सुदैवाने जीवितहानी टळली आहे.
अमरावती : अमरावती शहरात मुसळधार पाऊस सुरू असून शहरातील लालखडी परिसरातील अंबा नाल्यात बालक पुरात वाहून गेला आहे. मुसळधार पावसामुळे अमरावती मधील अंबा नाल्याला पूर आला असून यामध्ये १४ वर्षीय परवेज खान अफरोज खान वाहून गेला. घटनास्थळी रेस्क्यू पथक दाखल झाले असून नाल्यात शोध मोहीम सुरू आहे. घटनास्थळी नागरिकांची प्रचंड गर्दी केली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय खोडके घटना स्थळी दाखल झाले आहेत. इथे क्लिक करा
मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर पाणी आल्याने गुडघाभर पाण्यातून वाहने चालवावी लागल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. खोपोलीजवळ बोरघाटात अमृतांजन पुल परिसरात रस्त्यावर पाणी आले आहे. मुंबईकडे येणाऱ्या लेनवर इथे सखल भाग असल्याने पाणी साचले असून वाहनांना पुढं येताना खूप कसरत करावी लागते आहे. यावेळी वाहन चालकांना मार्गदर्शन करण्यासाठी वाहतूक पोलीस तैनात आहेत.
मुंबई गोवा महामार्ग लगत असणाऱ्या चिंचवली येथील चिंचवली बोरघर मार्ग देखील संततदार कोसळणाऱ्या पावसामुळे नदीला आलेल्या पुराच्या पाण्याने पाण्याखाली गेला आहे यामुळे चिंचवली गावाचा खेड तालुक्यातील इतर गावांची संपर्क पूर्णपणे तुटला असून खेड तालुका प्रशासन याकडे लक्ष ठेवून आहे.
रत्नागिरी - जगबुडी, नारंगी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. मुसळधार पावसामुळे खेड मधील मच्छी मार्केट आणि बाजारपेठेतील सखल भागात पाणी असून त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सततच्या पावसाच्या पाण्यामुळे शेकडो हेक्टर भातपीक पाण्याखाली गेले असून प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
- वर्धा जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला असून चार दिवसांपासून जिह्यातील नागरिक दमदार पावसाच्या प्रतीक्षेत होते. पावसाच्या आगमनाने शेतकऱ्यांची चिंता मिटली असून जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यात जोरदार पाऊस झाला. आता या पावसामुळे शेतीकामांना वेग येणार आहे.
मुंबई नाशिक महामार्गावर नवीन कसारा घाटत धबधबा पाॅइंट जवळ 5 वाहनांचा चित्रित अपघात झाले असून अपघातातील जखमींना कसारा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघाताच्या वाहनांन मध्ये मारूती सियाझ ,ह्युंडाई,किया,मारूती बलेनो अस्या पाच वाहनांचा अपघात झाले आहे.
विठुरायाच्या सासुरवाडीची पालखी आता पंढरपुरात दाखल झाली आहे. आषाढी यात्रेसाठी आता मानाच्या पालख्यांचे पंढरपुरात आगमन होण्यास सुरुवात झाली आहे. विठ्ठलाच्या सासरची अर्थात रुक्मिणी मातेच्या माहेरची असणाऱ्या कौंडण्यपूर येथील मानाची पालखी आज पंढरपुरात दाखल झाली. ७०० किलोमीटरचा प्रवास करत रुक्मिणी मातेचा पालखी सोहळा पंढरपूरला आला आहे. टाळ मृदुंगाच्या गजरात ...विठ्ठलाचा आणि रुक्मिणी मातेचा गजर करत पालख्या दाखल झाल्या आहेत.
उल्हास नदीने इशारा पातळी गाठली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या उल्हास नदीची पातळी 16.10 असून 16.70 हि धोक्याची पातळी आहे. या नदी जवळील खेळणी आणि जिमचे साहित्य पाण्याखाली गेले आहे. रायगड जिल्ह्यात पडत असलेल्या पावसाचे पाणी उल्हास नदी मध्ये सोडनल्याने नदी ओसांडून वाहत आहे.
केंद्रीय मंत्री अमित शाह आजपासून इंदूरच्या दौऱ्यावर आहेत. 'एक पेड माँ के नाम' मोहिमेअंतर्गत मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये आयोजित '11 लाख वृक्षरोपण' कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले इंदूर हे स्वच्छता, चव आणि उत्तम प्रशासन यासाठी ओळखले जाते. आजपासून इंदूर 'ग्रीन सिटी' म्हणूनही ओळखले जाईल.
अमेरिकेचे माजी राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर प्रचारसभेदरम्यान गोळीबार झाला. ही घटना पेनसिल्व्हेनियामध्ये रॅली घेत असताना घडली. रॅलीत असताना एकाने गोळीबार केला. नाटो प्रमुखांनी ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करत म्हणाले राजकीय हिंसेला लोकशाहीत स्थान नाही.
हवामानाच्या परिस्थितीबद्दल, आयएमडीचे शास्त्रज्ञ डॉ नरेश कुमार यांनी सांगितले मान्सून आजपासून खाली सरकत आहे. त्यामुळे आम्ही कर्नाटक, केरळ, कोकण गोव्यासाठी येत्या काही दिवसांसाठी रेड अलर्ट जारी करत आहोत. दिल्ली-एनसीआरमध्ये हलका पाऊस पडेल सध्या तरी दिल्लीसाठी कोणताही इशारा नाही.
आसाममधील मोरीगावमध्ये पूरस्थिती गंभीर आहे, त्यामुळे अनेक लाेकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (ASDMA) च्या माहितीनुसार यावर्षीच्या पुरामुळे राज्यभरात आतापर्यंत 91 जणांचा मृत्यू झाला आहे तर 21 जिल्ह्यांतील 8.40 लाखांहून अधिक लोक प्रभावित झाले आहेत.
उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती विश्वनाथ रथ यांनी पुरीच्या जगन्नाथ मंदिरात रत्न भांडार उघडण्याबाबत माहिती दिली आहे. रत्न भांडाराचे आतील कक्ष रविवारपासून उघडण्याची प्रक्रिया सुरू होईल. आतील आणि बाहेरील भंडारामधील दागिन्यांचा साठा निश्चित केला आहे.
विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालांबद्दल केसी त्यागी म्हणाले पोटनिवडणुकीचा निकाल काहीही असो, आम्ही त्याचे स्वागत करतो. 1-2 ठिकाणी काँग्रेसला विजय मिळाला होता आणि मला याचा आनंद आहे.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईतील वर्षा निवासस्थानी भेट घेतली. यावेळी नागरी उड्डाण मंत्री आणि टीडीपी नेते राम मोहन नायडू देखील उपस्थित होते.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू मुंबईत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहे.
मुसळधार पावसामुळे भिवंडीच्या कामरी नदीला पूर आला आहे. ठाणे आणि कल्याणमध्ये विशेषत: कल्याण वेस्ट रेल्वे स्थानकाच्या बाहेर पाणी साचल्याने प्रवासी आणि दुकानदारांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
मुंबईसर परिसरात पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेवरील लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. बोरिवली ते विरार दरम्यानची सेवा विस्कळीत झाल्याची माहिती आहे.
लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी घाई करण्याची गरज नाही. ऑगस्टमध्ये फॉर्म भरला तरी चालेल. त्यांना जुलैचे पैसे मिळणार आहेत. योजना राबवताना काही अडचणी येतात. पण, सर्व गरिबांना लाभ मिळेल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेत.
अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. याप्रकरणी पंतप्रधान मोदी यांनी या हल्ल्याचा निषेध केलं आहे. मोदींनी यासंदर्भात ट्वीट केलं आहे.
मुंबई शहर आणि उपनगरात काही ठिकाणी मुसळधार, तर काही ठिकाणी अती मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.असे मुंबई महापालीकेने कळवले आहे.
विम्बल्डन पुरुषांच्या अंतिम सामन्यात आज गतविजेता कार्लोस अल्काराझ आणि माजी विजेता नोवाक जोकोविच यांच्यात सामना होत आहे. गतवर्षीही हेच दोन प्रतिस्पर्धी एकमेकांविरुद्ध लढले होते.
मुंबईसह परीसरात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे मुंबई लोकल उशिराने धावत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.